शिक्षक, आरोग्य कर्मचार्यांचे प्रश्न सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:36 IST2021-03-24T04:36:33+5:302021-03-24T04:36:33+5:30
कोरेगाव : शिक्षक आणि आरोग्य विभागातील कर्मचार्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जुन्या पेन्शन हक्क योजनेचा विषय ऐरणीवर असून, तो ...

शिक्षक, आरोग्य कर्मचार्यांचे प्रश्न सोडविणार
कोरेगाव : शिक्षक आणि आरोग्य विभागातील कर्मचार्यांचे अनेक प्रश्न
प्रलंबित आहेत. जुन्या पेन्शन हक्क योजनेचा विषय ऐरणीवर असून, तो सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जाणार आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
सातारा जिल्हा परिषदेत सोमवारी आमदार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व
शिक्षण-अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी व पशुसंवर्धन
समितीचे सभापती मंगेश धुमाळ यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय बैठक झाली.
त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये,
शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्यासह खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित
होते.
आ. शिंदे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या
शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात भेट घेऊन नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत
आलेल्या सर्व कर्मचार्यांना १९८२ प्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू
करण्याची मागणी केली होती. सहा लाखांपेक्षा अधिक लोकांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न असून, तो सोडविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्नशील
राहील. त्याबाबत काही अडचणी असल्यास त्या आम्ही लक्ष घालून निश्चितपणे
सोडवू.
आरोग्य विभागातील पदोन्नतीचा विषय अनेकवेळा मागे पडलेला आहे, त्यामुळे कर्मचार्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कोरोना काळात त्यांनी जिवाची बाजी
लावून काम केले आहे, त्यांच्यावर कदापी अन्याय होता कामा नये. प्रशासनाने
पूर्ववत पदोन्नतीचे धोरण अंमलात आणावे, अशी सूचना आ. शिंदे यांनी दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत लोकप्रतिनिधी व अधिकार्यांनी भाग घेतला.
जिल्हास्तरावर येणार्या कागदोपत्री अडचणी त्वरित दूर करण्याची सूचना
यावेळी आ. शिंदे यांनी दिली.
फोटो : २३ साहील शहा
सातारा जिल्हा परिषदेत पार पडलेल्या शिक्षक आणि आरोग्य कर्मचार्यांच्या प्रश्नांचा आमदार शशिकांत शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी मानसिंगराव जगदाळे उपस्थित होते.फोटो : २३ साहील शहा
सातारा जिल्हा परिषदेत पार पडलेल्या शिक्षक आणि आरोग्य कर्मचार्यांच्या प्रश्नांचा आमदार शशिकांत शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी मानसिंगराव जगदाळे उपस्थित होते.