शहरं
Join us  
Trending Stories
1
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
6
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
7
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
8
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
9
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
10
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
11
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
12
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
13
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
14
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
15
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
16
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
17
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
18
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
19
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

भरतगाव बंधाऱ्यामुळे कायापालट होणार : शिवेंद्रराजे

By admin | Updated: November 28, 2014 00:12 IST

हजारो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे

सातारा : ‘भरतगाव येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असून, या बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा झाला आहे. या बंधाऱ्याच्या परिसरातील हजारो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. या बंधाऱ्यामुळे भरतगाव आणि परिसरातील गावांचा कायापालट होणार आहे. बंधाऱ्यातील पाण्याचा सदुपयोग करून भरतगाव परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीचे उत्पन्न वाढवून आर्थिक उन्नती साधावी,’ असे आवाहन सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून भरतगाव येथील के. टी. वेअर बंधाऱ्यासाठी एक कोटी १७ लाख रुपये निधी मंजूर झाला होता. या बंधाऱ्याचे काम जून महिन्यात पूर्ण झाले असून, या बंधाऱ्यात अर्धा टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या बंधाऱ्यातील जलपूजन आ. शिवेंद्रसिंंहराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या वनिता पोतेकर, सातारा पंचायत समितीचे उपसभापती सूर्यकांत पडवळ, माजी उपसभापती अ‍ॅड. अरविंंद चव्हाण, भरतगावचे सरपंच अशोक पाटील, विकास सेवा सोसायटीवे चेअरमन संजीवन कदम, ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले म्हणाले, दिवंगत भाऊसाहेब महाराजांनी सहकाराच्या माध्यमातून सातारा तालुक्यात विकासाची गंगा सुरू केली. अजिंंक्यतारा सहकारी साखर कारखान्यामुळे सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उसाला हक्काची बाजारपेठ मिळाली. उसाचे उत्पादन वाढावे, यासाठी पाण्याची उपलब्धता आवश्यक आहे. भरतगाव, भरतगाववाडी, वळसे, पाडळी आदी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने भरतगाव येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्याच्या उभारणीनंतर लगेचच बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा झाला. या बंधाऱ्यामुळे आसपासच्या गावचा शेतीचा पाणीप्रश्न कायमचा सुटला आहे. या बंधाऱ्यामुळे या परिसरातील हजारो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उसाचे पीक घ्यावे. टनेजमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. योग्य नियोजन करून शेतकऱ्यांनी बंधाऱ्यातील पाण्याचा शेतीच्या उत्पादन वाढीसाठी वापर करावा आणि आपली आर्थिक उन्नती साधावी.’
सरपंच अशोक पाटील, सोसायटीे सचिव विकास कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमास भरतगाव, वळसे, भरतगाव वाडी, पाडळी आदी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)