नागरी वस्तीत रानगव्यांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:06 IST2021-02-05T09:06:56+5:302021-02-05T09:06:56+5:30

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील कोपर्डे गावच्या हद्दीत रानगव्यांचा वावर असल्याचे दिसून आले. येथील राखीव वनक्षेत्रातून हे रानगवे गावच्या शिवारात ...

Wildlife in urban areas | नागरी वस्तीत रानगव्यांचा वावर

नागरी वस्तीत रानगव्यांचा वावर

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील कोपर्डे गावच्या हद्दीत रानगव्यांचा वावर असल्याचे दिसून आले. येथील राखीव वनक्षेत्रातून हे रानगवे गावच्या शिवारात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वन्यप्राण्यांचा नागरी वस्तीतील शिरकाव हा चिंतेचा विषय बनला आहे.

कोपर्डे गावच्या शिवाराशेजारी डोंगरालगत राखीव वनक्षेत्र आहे. त्यामुळे येथे जंगली प्राण्यांचा नेहमीच वावर दिसून येतो. लांडगे, तरस, कोल्हे, ससे, रानडुक्कर, हरिण यासह अनेक वन्यप्राणी येथे आढळून येतात. मात्र, या भागात रानगव्यांचा वावर आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वास्तविक, या डोंगरभागालगत गावकऱ्यांची शेती असल्याने शेतीकामासाठी शेतकऱ्यांची नेहमी येजा असते. त्यामुळे रविवारी सकाळी गावातील अनिल बोडरे, मोहन बोळे यासह काही तरुण धोम बलकवडी कालव्यावरून जात असताना गव्यांचा कळप दिसून आला. कळप ऊस आणि पेरूच्या बागेत घुसल्याने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. या भागात शेतीच्या कामासाठी जाताना दक्षता घेण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

फोटो : ३१ खंडाळा

खंडाळा तालुक्यातील कोपर्डे गावानजीक रविवारी सकाळी गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले.

Web Title: Wildlife in urban areas