शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: ढेबेवाडी विभागात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान; शेतकरी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 18:12 IST

वनविभागाला जाग कधी येणार, अशी शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया

कऱ्हाड : ढेबेवाडी विभागात रानडुकरांनी व गव्यांनी धुमाकूळ घातला आहे. ऊस पिकासह भुईमूग, भात पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. तरीही वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीकडे दुर्लक्ष करीत आहेत.ढेबेवाडी विभाग डोंगरी व जंगलाने व्यापलेला आहे. गत आठ-दहा वर्षांत येथे जंगल मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी रानडुकरांसह गव्यांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. रानडुकरांनी काळगाव, उमरकांचन, सणबूर, सळवे परिसरात उच्छाद माजविला आहे. जानुगडेवाडी, बनपुरी, सळवे व बाचोली याठिकाणी रानडुकरांनी नुकसान केले आहे. रानडुकरांचे कळप रात्री शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त करीत आहेत.तर निवी, कसणी, वरचे घोटील, कारळे, सातर, तामिणे व पानेरी या गावांना जंगल लागूनच असल्याने रानडुकरांबरोबरच, गवे पीक उद्ध्वस्त करीत आहेत. मात्र, वनविभागाचे कर्मचारी सुस्त आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास टाळाटाळ करून आपली जबाबदारी झटकत आहेत. वनविभागाला जाग कधी येणार, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.नुकसानग्रस्तांना भरपाई मिळेनावनविभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यापेक्षा टाळाटाळ करण्यात धन्यता मानत आहेत. पंचनामे करून आपला फायदा नाही, अशी मानसिकता या वन कर्मचाऱ्यांची झाली आहे. परिणामी, शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी