वन्य प्राण्यांचा उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:13 IST2021-02-05T09:13:01+5:302021-02-05T09:13:01+5:30

सणबूर : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात सध्या तरस, लांडगा, रानडुक्कर यांचा उपद्रव वाढला आहे. या प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत ...

Wildlife nuisance | वन्य प्राण्यांचा उपद्रव

वन्य प्राण्यांचा उपद्रव

सणबूर : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात सध्या तरस, लांडगा, रानडुक्कर यांचा उपद्रव वाढला आहे. या प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत आहे. प्राण्यांना हुसकावण्यासाठी ग्रामस्थांना पिकांची राखण करावी लागत असल्याची परिस्थिती आहे.

खड्ड्यांमुळे त्रस्त

कऱ्हाड : येथील पंचायत समिती ते भेदा चौक मार्गावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यावरून वाहने चालविताना चालकांना नाहक त्रास होत आहे. दुचाकीधारक खड्ड्यात पडून जखमी झाल्याचेही प्रकार घडले आहेत. या रस्त्याची पालिकेने तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

कठड्यांची दुरवस्था

कऱ्हाड : सुर्ली घाटातील संरक्षक कठड्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी संरक्षक कठडे ढासळले असल्याने घाटातील वाहतूक धोकादायक बनली आहे. गुहागर-पंढरपूर राज्यमार्गावर सुर्ली घाट लागतो. या घाटातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वर्दळ होते. मात्र, सध्या हा घाट धोकादायक बनला असून बांधकाम विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे.

फलकाची दुरवस्था (फोटो : ०३इन्फो०२)

तांबवे : पोतले, ता. कऱ्हाड येथे हनुमान मंदिरासमोर असलेल्या दिशादर्शक फलकाची दुरवस्था झाली आहे. फलकावर झाडवेलींनी विळखा घातला असल्याने फलकाला गंज चढला असून, तो मोडकळीस आला आहे. जागोजागी असणाऱ्या सूचना फलकांचा चालकांना फायदा होतो. मात्र, त्याची देखभाल ठेवली जात नसल्याने असे फलक असून अडचण नसून खोळंबा बनले आहेत.

Web Title: Wildlife nuisance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.