शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कास परिसरातील डोंगरमाथ्यावर भाताची रोपे फस्त करताहेत वन्यप्राणी, शेतकरी हतबल

By दीपक शिंदे | Updated: June 19, 2024 17:51 IST

गव्यांकडून भाताच्या रोपांचे नुकसान

पेट्री : वादळी वारा, मुसळधार पावसाची पर्वा न करता शहराच्या पश्चिमेकडील कास परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भातशेती करतात. दरम्यान, डोंगरमाथ्यावरील भागात जंगली प्राण्यांपासून भातशेतीचे व नाचणीच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. परिसरातील शेतकरी या समस्येमुळे हतबल झाले आहेत. बहुतांशी शेतकरी नुकसान होऊ नये म्हणून शेताला कुंपण घालत आहेत.कास परिसरातील डोंगरमाथ्यावरील भागात नाचणी व भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. उन्हाळ्यात तरव्याच्या भाजण्या करून मे व जूनमध्ये धूळवाफेला पेरणी केली जाते. यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात वाफसा चांगला झाला. अधूनमधून ऊन-पाऊस यामुळे रोपांची वाढ होण्यास पोषक वातावरण आहे. ओढ्यांना पुरेसे पाणी आल्यानंतर महिनाभरात मोठ्या पावसात चिखल करून भात लावणीला प्रारंभ होणार आहे. परंतु, रात्री भाताच्या, नाचणीच्या वावरात तरव्यांमध्ये केलेली रोपे खाण्यासाठी अनेक जंगली प्राणी येत आहेत.साळिंदर, ससे, रानगवे, रानडुक्कर रात्री वावरात येऊन रोपे खात आहेत तसेच रोपे तुडवून नासधूस करत आहेत. त्यामुळे संरक्षणासाठी झडपी ठोकडा, बुजगावण्यासारख्या अनेक उपाययोजना शेतकरी करत आहेत. काहीजण रात्री रानात ओरडून जनावरांना हाकलत आहेत. काही दिवसानंतर भात लावणीला प्रारंभ झाल्यावर भाताच्या रोपांचा तुटवडा भासणार आहे. यामुळे शेती लावणीअभावी पडून राहून आर्थिक झळ बसणार आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी सोसायटीचे पीक कर्ज घेतले असल्याने पीक विम्याचे संरक्षण मिळण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.भात लावणीसाठी दोन ठिकाणी तरव्यातून भाताची रोपे तयार केली. परंतु, मंगळवारी रात्री या दोन्ही ठिकाणी रानडुकरांच्या कळपाने रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर भाताचा वाफसा खाऊन तुडवून नासधूस केली असल्याने भात लावणीसाठी रोपांची कमतरता भासणार आहे. तसेच झालेली नुकसानभरपाई मिळावी.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीforest departmentवनविभाग