शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Satara: अंगावर पेट्रोल ओतून दिव्यावर ढकलल्याने पत्नी गंभीर जखमी, पतीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 11:58 IST

फलटण : पिंप्रद ता.फलटण येथे देवघरात दिवाबत्ती करीत बसलेल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने दिव्यावर ढकलले. ...

फलटण : पिंप्रद ता.फलटण येथे देवघरात दिवाबत्ती करीत बसलेल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने दिव्यावर ढकलले. यात पत्नी ९१ टक्के भाजून गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर फलटणमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना गुरुवार, दि. २३ रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.भानू शंकर पवार (वय ५०, रा.पिंप्रद, ता.फलटण) असे जखमी पत्नीचे नाव आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, भानू पवार या गुरुवार, दि. २३ रोजी सायंकाळी सहा वाजता घरातील देवघरात दिवाबत्ती करीत बसल्या होत्या. त्यावेळी त्यांचा पती शंकर महादेव पवार (वय ६०) हा तेथे आला. त्याने अचानक पेट्रोलची बाटली पत्नीच्या अंगावर ओतली. त्यानंतर, तिला दिव्यावर ढकलून दिले. साडीने पेट घेतल्याने यात पत्नी भानू पवार ९१ टक्के गंभीररीत्या भाजून जखमी झाल्या. या झटापटीत पती शंकर पवार याच्या हाताला आणि तोंडाला किरकोळ भाजले. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी त्यांची सून सायली अमित पवार (वय २०) हिने रविवारी, दि. २६ रोजी दुपारी पावणेचार वाजता फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर, पोलिसांनी शंकर पवारवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस आणि पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासकामी पोलिसांना सूचना दिल्या. सहायक फौजदार तुकाराम सावंत हे अधिक तपास करीत आहेत.चारित्र्याच्या संशयाचे कारण!पोलिसांनी सांगितले की, पत्नी भानू ही पतीवर चारित्र्याचा संशय घेत होती. यातून दोघांमध्ये वाद होत होता. हा प्रकार यातूनच घडला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. नातेवाइकांकडे, तसेच जखमी भानूचा जबाब नोंदविल्यानंतर आणखी यातील वस्तुस्थिती समोर येणार असल्याचे तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी