शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

विधवेची जमीन दलालांकडून गिळंकृत!

By admin | Updated: December 10, 2014 23:56 IST

ढेबेवाडी विभागातील घटना : सातबारावरून नाव गायब करून बोगस व्यवहार

ढेबेवाडी : पवनचक्कीच्या वाऱ्यावर मिळालेल्या ‘वारे’माप पैशातून गबर झालेल्या दलालांनी आता महसूल विभागालाच आव्हान दिल्याच्या घटना पाटण तालुक्यात उघडकीस आल्या आहेत. ढेबेवाडी विभागातील वाल्मीक पठारावर चक्क एका विधवा महिलेला गंडा घालून तिच्या परस्पर सुमारे पाच एकरचा भूखंड हडप केल्याची घटना उघडकीस आल्याने विभागात शेतकरी धास्तावले आहेत.वाल्मीक पठारावरील तामीणे, पळणी, पाणेरी, आंबवडे, उधवणे आदी गावातील हजारो हेक्टर जमिनीची विक्री अलीकडे पाच-सहा वर्षांमध्ये झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डोंगरपठारावरील भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांना गंडा घालून कवडीमोल दराने जमिनी गिळंकृत करुन आतापर्यंत पवनचक्की दलालांनी वारेमाप कमाई केली आहे.ज्या गावातील जमीन खरेदी करायची आहे, तेथीलच एखादा गावपुढारी अथवा गुंड हाताशी धरुन जमीन बळकावल्याच्या घटना राजरोस घडू लागल्याने आता शेतकरीही शहाणा झाला आहे. शेतकऱ्यांकडून एकरात खरेदी करुन कंपन्यांना गुंठेवारीवर विक्री करणारी दलालांची भानगड समोर आल्याने दलाल सैरभैर झाले आहेत. वाल्मीक पठारावर १५ नोव्हेंबर २०१४ रोजी अशाच एकपाच एकर सहा गुंठे भूखंडाचा दस्त झाला. तामीणे येथील २७ चा २१ या गटातील १०६ गुंठे जमिनीचा झालेला हा व्यवहार म्हणजे दलालांनी थेट महसूल विभागाला दिलेलेआव्हानच म्हणावे लागेल. या गटातील ७/१२ ज्या विधवा महिलेच्या नावावर आहे, त्या महिलेचे नावच चक्क ७/१२ वरुन गायब करण्याचे धाडस दलालांनी करुन बोगस व्यवहारांचा कळसच गाठला आहे.यापूर्वीही पळशी येथील दलालांच्या टोळक्याने मृत खातेदारांच्या नावे व्यवहार केल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यांच्यावर गुन्हे दाखल असतानाच आता या विभागात नवीन दलालांचे रॅकेट निर्माण झाल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. दलालांकडून भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांची एक प्रकारे लूटच केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. (वार्ताहर)डोंगरपठारावर आतापर्यंत झालेल्या व्यवहारांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी. अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा. दोषी दलालांवर कारवाई करावी.- दिलीप पाटील, नेते श्रमिक दलतामीणे येथील दस्ताची नोंद मंजुरीसाठी मंडल कार्यालयाकडे अजून झालेली नाही. त्यानंतर त्याची चौकशी करुन दोष असल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे कळविले जाईल.- राजपूत, मंडल अधिकारी त्या महिलेवर दबावज्या महिलेचे नाव ७/१२ वरुन अचानक गायब झाले आणि त्याच गटातील १०६ गुंठ्यांचा व्यवहार झाला. तरीसुद्धा संबंधित महिला अजून गप्प का? तिच्यावर दलालांनी दबाव टाकला आहे का? याचीही चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.या व्यवहारात दुय्यम निबंधकांची फसवणूक झाली असेल तर त्यांच्यामार्फत संबंधितावर गुन्हे दाखल होतील. अशा घटना घडू नयेत यासाठी शेतकऱ्यांसाठी दर सहा महिन्यांनी ७/१२ काढून तपासून घ्यावा.-रवींद्र सबनीस, तहसीलदार, पाटण