शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चला पूजूया माणसातील देव; साताऱ्यात नवरात्रीत विधवा, कष्टकरी महिलांची केली पाद्यपुजा

By प्रगती पाटील | Updated: October 20, 2023 13:14 IST

सातारा : राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील संस्कार वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नवरात्रोत्सवाचे औचित्य ...

सातारा : राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील संस्कार वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून चला माणसातील देव पूजूयात या उपक्रमांतर्गत विधवा व कष्टकरी महिलांची पाद्यपूजा केली. कपाळी ल्यायलेल्या हळदी-कुंंकवाच्या साक्षीने साडीचोळीने ओटी भरुन समाजात वैचारिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवत बालमनावर संस्कारही करण्यात आले. शाहूपुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत भोसले होते. यावेळी बोलताना भोसले म्हणाले, ‘विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सद्यस्थितीत सर्वांगीण विकास साधायचा झाल्यास त्यांच्या अंतर्मनाची जडणघडण सद्विचारांनी युक्त होण्यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच सामाजिक भान जागृत ठेवणा-या सृजनशील विचारांची पेरणीही गरजेची आहे. सण हे समाजामध्ये चैतन्य निर्माण करुन त्याला एकसंध ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.या नवरात्रोत्सवात मंदिरातील देवीच्या मूर्ती पूजेबरोबरच आपल्या घरातील, अवतीभवतीच्या विधवा महिलांसह सर्व महिलांना ईश्वरस्वरुप मानून तिचा सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. यासाठी नुसते कार्यक्रम करून, फोटोसेशन करून भागणार नाही तर या भूमिकेला हृदयापासून सर्वांनी स्विकारण्याचा संकल्प  केला आणि भविष्यात तशी कृती केली तरच उद्याचा समाज निकोप बनू शकेल असा आशावाद व्यक्त केला.याप्रसंगी संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून आपली आई व तिच्या कष्टपूर्ण आयुष्याविषयी विद्यार्थ्यांनी विचार मांडले. शोभा चव्हाण या पालक महिलेने ही वैचारिक परिवर्तनाची लढाई असल्याचे सांगितले. शालाप्रमुख एस. एस. क्षिरसागर यांनी प्रास्ताविक केल. यश गुरव या विद्यार्थ्याने आभार मानले. सूत्रसंचालन पी. एस. निंबाळकर यांनी केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNavratriनवरात्री