शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
5
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
6
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
7
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
8
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
9
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
10
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
11
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
12
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
13
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
14
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
15
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
16
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
17
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
18
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
19
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
20
Shirish Valsangkar: वळसंगकर रुग्णालयासह 'त्या' चारही डॉक्टरांची बँक खाती तपासा, मनीषा मानेचं पोलिसांना पत्र

वाईचा घाट ठरतोय अपघातांची वाट !

By admin | Updated: May 7, 2017 14:43 IST

संरक्षक कठडे ढासळले : अपघातांचे सत्र सुरूच, जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास ?

आॅनलाईन लोकमतवाई (जि. सातारा), दि. ७ : वाई-पाचगणी मार्गावर असलेल्या पसरणी घाटात सध्या अपघातांची मालिका सुरु आहे. हे अपघात इतके भयंकर आहेत की, अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. पसरणी घाटातील संरक्षक कठड्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून गेल्या अनेक महिन्यापासून ही परिस्थिती जैसे थे असल्याने वाहनचालकांची जीव टांगणीला लागला आहे.वाई-पाचगणी दरम्यान असलेल्या पसरणी घाटातून सतत वाहतूक सुरू असते. महाबळेश्वर पाचगणी या पर्यटनस्थळांकडे जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने पर्यटकही याच घाटातून ये-जा करतात. मात्र, सध्या वाहनधारकांसह पर्यटकांना जीव धोक्यात घालूनच घाटातून प्रवास करावा लागत आहे.या घाटातील ठिकठिकाणी असलेल्या संरक्षक कठड्यांची पडझड झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही परिस्थिती जैसे थे आहे. ज्या ठिकाणी कठड्यांची पडझड झाली आहे त्या ठिकाणी वाळून भरलेली पोती आणि प्लास्टीकचे बॅरल संरक्षणासाठी उभे करण्यात आले आहेत. कठड्यांची पडझड झाल्याने या घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह पर्यटकांन प्रामुख्यांने रात्रीच्या वेळी धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. संरक्षक कठडे दिसत नसल्याने अपघात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. घाटातील संरक्षण कठड्यांची चाळण झाली असून बांधकाम विभागाकडून अद्याप कसलीही उपाययोजना करण्यात आली नाही. वाळूनी भरलेली पोती आणि फुटके ड्रम ढासळलेल्या कठड्यांचे संरक्षण करीत असल्याचे विदारक चित्र सध्या पसरणी घाटात पहावयास मिळत आहे.घाटात सात ते आठ ठिकाणी भलेमोठे भगदाड पडलेले असताना बांधकाम विभागाकडून दुरुस्तीबाबत कोणत्याही हालचाली केल्याचे दिसत नाही. अपघातात किती जणांचे जीव गेल्यावर बांधकाम विभाग कठड्यांच्या कामास सुरुवात करणार, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. वाहतूक कोंडी नित्याचीचवाईहून पाचगणी महाबळेश्वर तसेच महाड मार्गे कोकणात जाण्याचा मुख्य मार्ग पसरणी घाटच असल्याने या घाटात वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते. एखादा अपघात झाल्याने घाटात वाहतुकीची कोंडी होते. सध्या पर्यटकांचा उन्हाळी हंगाम सुरू असल्याने वाहनांच्या घाटात चार-पाच किलोमीट अंतरावर रांगा लागत आहे. रुंदीकरणाची गरजपसरणी घाटातून होणारी दळवळण पाहता या घाटाचे वाहतुकीच्या दृष्टीने रुंदीकरण करणे गरजेचे आहे. काही माहिन्यांपूर्वी बांधकाम विभागाकडून रस्ता रुंदीकरणाचा शुभारंभ करण्यात आला होता. परंतु सध्या ते काम बंद आहे. बांधकाम विभागाने या बाबीची गांभीयार्ने दखल घेवून वाहन चालकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार थांबवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.याच आठवड्यात अपघातपसरणी घाटात काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका ट्रक चालकाला आपला प्राण गमवावा लागला. ताबा सुटल्याने एक माल टक्र दहा ते पंधरा फूट लांबीचा संरक्षक कठडा तोडून दोनशे फुट खोल दरीत कोसळला. त्यामुळे संरक्षक कठड्यांच्या कामाचा कामाचा दर्जा तपासण्याची वेळ आली आहे.