शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: माझ्यासोबत प्रेमाचं नाटक का केलंस; जाब विचारत तरुणीचा विनयभंग

By दत्ता यादव | Updated: August 22, 2023 15:58 IST

इन्स्टाग्रामवरून त्यांची मैत्री वाढत गेली

सातारा : काॅलेजला जाता-येता तसेच इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राने वाटेत अडवून महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना साताऱ्यात घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पुणे जिल्ह्यातील एकावर गुन्हा दाखल झाला आहे.जय सुदाम दंडवते (रा. वाघोली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी २० वर्षांची असून, ती पुणे जिल्ह्यातील रहिवाशी आहे. शिक्षणाच्या निमित्ताने ती साताऱ्यात वास्तव्य करत आहे. मैत्रिणीसोबत काॅलेजला येता-जाता संशयित जय दंडवतेची तिची ओळख झाली. त्यानंतर इन्स्टाग्रामवरून त्यांची मैत्री वाढत गेली. मात्र, दोघांमध्ये भांडणे झाल्यानंतर मारहाण करीत असल्यामुळे पीडित तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले. तरी सुद्धा जय दंडवते हा तिचा सतत पाठलाग करत होता. माझ्या सोबत प्रेमाचे नाटक कशाला केलेस, असं म्हणून तिला अश्लील शिवीगाळ केली. तसेच तिच्या अंगावर धावून गेला. एवढेच नव्हे तर तिच्या सोबत असलेल्या मैत्रिणीलाही त्याने शिवीगाळ केली. हा प्रकार असाह्य झाल्याने पीडित मुलीने तिच्या आई-वडिलांना याची माहिती दिली. त्यानंतर सोमवार, दि. २१ रोजी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. हवालदार वाघमारे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी