शहरं
Join us  
Trending Stories
1
Walmik Karad : धनंजय मुंडेंकडून वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न; कासलेंचा गंभीर आरोप
2
"सर्व जळून खाक, काहीही शिल्लक नाही; अनेक कुटुंबांनी घर सोडून पळून जाण्याचा घेतला निर्णय"
3
पश्चिम बंगालसारखा हिंसाचार देशाच्या अन्य राज्यातही भडकणार?; केंद्र सरकार अलर्ट
4
Sambhaji Bhide Guruji: संभाजी भिडे गुरुजी यांच्या पायाचा कुत्र्याने घेतला चावा, सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
5
वारी निघाली लंडनला...!! २२ देशातून १८ हजार किमी प्रवास; पंढरपूर ते लंडन दिंडीचे प्रस्थान
6
सोशल मीडियावर केली अशी चूक तर अमेरिकेत मिळणार नाही प्रवेश, ट्रम्प यांचा नवा आदेश 
7
SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर, बँकेनं कर्जाचे व्याजदर केले कमी; EMI चा भार हलका होणार, पाहा नवे दर
8
मला भरत जाधवचा भाऊ म्हणायचे! सिद्धू म्हणाला- "त्यांच्यामुळे मला सिनेमासाठी १ लाख रुपये..."
9
तिघे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील, खडखड होणारच; चंद्रकांत पाटलांनी नाराजीचा चेंडू भिरकावला
10
धक्कादायक! सासू आधी शेजारच्या गावातील महिलेसोबत गेलेला पळून; जावयाचा नवा कारनामा
11
महिलांना ई-स्कूटरवर मिळणार ३६००० ची सबसिडी? 'हे' राज्य सरकार आणणार नवीन ईव्ही पॉलिसी
12
"औरंगजेबाचं वय बघता तो वेगाने चालू शकेल?" आस्ताद काळेच्या ५ पोस्ट; 'छावा' सिनेमावर केली टीका
13
मेहुल चोक्सीला फरार घोषित करण्यास विलंब; ईडीचा अर्ज कोर्टात ७ वर्षे प्रलंबित
14
"फार वाईट सिनेमा आहे", शर्मिला टागोर यांनी नातवाच्याच 'नादानियां'वर केली टीका; म्हणाल्या...
15
Arjun Tendulkar IPL 2025: Mumbai Indians खेळायची संधी देईना, त्याचदरम्यान अर्जुन तेंडुलकरची इन्स्टा स्टोरी चर्चेत
16
Stock Market Today: शेअर बाजार सुस्साट... १६९५ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex; मेटल, रियल्टी शेअर्समध्ये बंपर वाढ
17
‘मंदिरात ताकद असती तर देशात लुटारू आलेच नसते’, समाजवादी पार्टीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
18
डोनाल्ड ट्रम्प फोडणार आणखी एक बॉम्ब; २० एप्रिलनंतर अमेरिकेत काय घडणार? लोक चिंतेत
19
क्रिकेट की बिझनेस… IPL ची ब्रँड व्हॅल्यू ऐकून अवाक् व्हाल, या खेळात कसा खेचला जातोय पैसा?
20
दोन नराधमांकडून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; चिमुरात तणाव, जमावाची पोलीस ठाण्यावर दगडफेक, आरोपी अटकेत

राज्यपाल निवासस्थानासाठी ४८ एकर जागा कशाला? - उदयनराजे भोसले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 11:44 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी ४० एकर जागा मिळावी

सातारा : राज्यपालांच्या निवासस्थानासाठी ४८ एकर जागा ठेवली आहे. एवढी कशाला पाहिजे ?. यापेक्षा आठ एकर जागा निवासस्थानासाठी ठेवावी. उर्वरित ४० एकर जागा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी द्यावी, अशी भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली. तसेच याबाबतची मागणी राज्य आणि केंद्र शासनाकडेही केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे बोलत होते. ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे, अण्णा वायदंडे, अप्पा तुपे आदी उपस्थित होते.खासदार उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निवडण्यात आलेली अरबी समुद्रातील जागा नैसर्गिकदृष्ट्या योग्य नाही. मुंबईतील राजभवनची ४८ एकर जागा आहे. यामधील ४० एकर जागा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी मिळावी. तेथे शासनाने शिवरायांच्या पराक्रमाला साजेसे असे स्मारक उभे केले पाहिजे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचा अवमान होऊ नये यासाठीचा कायदा काँग्रेस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनेही केला नाही. शिवसेनेच्या नावातच शिवाजी महाराजांचे शिव आहे; पण त्यांनीही काही केले नाही. आता कायदा होत आहे. हे माझ्याकडून होत असल्याने आयुष्यातील मोठे काम ठरणार आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साताऱ्यात राहत होते. ते घर लवकरच शासनाच्या ताब्यात घेऊन डाॅ. आंबेडकर यांच्या आठवणी जपण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्नशील राहणार आहे. तसेच साताऱ्यातील राजवाड्याबाबतही हेरिटेज ऑर्किऑलॉजिकल विभागाशी पत्रव्यवहार सुरू आहे. कारण, अशा वास्तू पुन्हा बांधून होणार नाहीत. त्यामुळे शासनानेही गांभीर्याने पावले उचलावीत, असेही खासदार उदयनराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.

खास रंगाची खास बात..उदयनराजे भोसले यांनी निळा शर्ट परिधान केला होता. याबाबत पत्रकारांनी विचारले असता ‘इंद्रधनुष्यामध्ये सात रंग असतात. ते सर्वांनाच आवडत असलेतरी त्यापैकी निळा रंग हा मला नेहमीच आवडतो. खास रंगाची खास बात आहे. मानवजातीत जात-पात करणाऱ्यांना मनुष्यधर्म कसा लक्षात येईल? एखाद्यास अपघातानंतर रक्ताची गरज पडली तर जात पाहून घेतो का ? जातिवाद थांबला नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराणी ताराराणी यांच्या समाधी जीर्णोद्धारासाठी बैठकसातारा शहराजवळील संगम माहुलीतील महाराणी ताराराणी यांच्या समाधीबद्दलही उदयनराजे यांनी माहिती दिली. समाधीच्या जीर्णोद्धारासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीच्या माध्यमातून समाधीच्या कामासाठी जो निधी लागेल, तो केंद्रातून आणू, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले