कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:43 IST2021-08-14T04:43:36+5:302021-08-14T04:43:36+5:30
पारच बंद केलं तर गोत्यात येऊ..! कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले होते, तेव्हा सर्व दुकाने पूर्णपणे बंद ...

कुजबुज
पारच बंद केलं तर गोत्यात येऊ..!
कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले होते, तेव्हा सर्व दुकाने पूर्णपणे बंद होती. मधल्या काळात थोडी सूट दिली मात्र पुन्हा रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाने निर्बंध कडक केले. एका टप्प्यात तर पूर्ण व्यवहार ठप्प झाले होते; परंतु आता काही प्रमाणात शिथिलता आणल्याने सर्वप्रकारची दुकाने सुरू झाली आहेत. मात्र वेळेची मर्यादा आहे. साताऱ्यातील एका स्टेशनरी दुकानात याबाबत चर्चा झडली होती. एकजण दुकानाच्या वेळा वाढवल्या पाहिजेत, असे म्हणाला. कमी वेळात खरेदी करावी लागत असल्याने धावपळ उडत असल्याचे त्याचे म्हणणे होते. त्यावर दुकानदाराने अतिशय नरमाईने उत्तर दिले. ‘दुकानं सुरू ठेवतात, हेच फार मोठं आहे. वेळा बदलल्या नाहीत तरी चालतील पण दुकान बंद ठेवण्याची सक्ती घालू नका म्हणावं...’ असं दुकानदार म्हणाला. दुकान बंद केल्यावर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो किमान यावर तरी पोट सुरू आहे, असं त्याचं म्हणणं होतं.