साताऱ्यात रिक्षातून प्रवास करताना महिलेचे अडीच तोळे सोने चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:35 IST2021-02-07T04:35:59+5:302021-02-07T04:35:59+5:30
सातारा : एसटी स्टँड ते मारवाडी चौक या मार्गावर रिक्षातून प्रवास करीत असताना एका महिलेचे पर्समध्ये ठेवलेले अडीच तोळे ...

साताऱ्यात रिक्षातून प्रवास करताना महिलेचे अडीच तोळे सोने चोरीला
सातारा : एसटी स्टँड ते मारवाडी चौक या मार्गावर रिक्षातून प्रवास करीत असताना एका महिलेचे पर्समध्ये ठेवलेले अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र एका अनोळखी महिलेने लंपास केले. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अनुराधा आनंदा गोगटे (६४, रा. लक्ष्मीप्रसाद अपार्टमेंट, मंगळवार पेठ, सातारा) या २४ जानेवारी रोजी सकाळी सव्वाअकरा ते पावणेबारा वाजण्याच्या सुमारास सातारा बस स्टॉप ते मारवाडी चौक या मार्गावर रिक्षाने प्रवास करीत होत्या. त्यांनी आपले ७५ हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र पर्समध्ये ठेवले होते. यावेळी त्यांच्यासमवेत प्रवास करणाऱ्या अनोळखी महिलेने पर्समधील मंगळसूत्रावर डल्ला मारला. दरम्यान, अनुराधा गोगटे यांनी याची तक्रार ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस नाईक काळभोर हे करीत आहेत.