शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
2
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
4
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
5
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
6
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
7
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
8
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
9
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
10
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
11
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
12
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
13
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
14
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
15
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
16
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
17
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
18
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
19
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
20
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे

Satara: पिंजरा सोडला विहिरीत, पण बिबट्या झेप घेत पळाला शिवारात; तळबीडमधील घटना 

By संजय पाटील | Published: March 29, 2024 12:15 PM

कऱ्हाड : विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असतानाच पायरीवरून थेट काठावर झेप घेत बिबट्याने शिवारात ...

कऱ्हाड : विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असतानाच पायरीवरून थेट काठावर झेप घेत बिबट्याने शिवारात धुम ठोकली. कऱ्हाड तालुक्यातील तळबीड येथे जानकर वस्तीत शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तळबीड येथील जानकर वस्तीवरील शिवारात बांधिव विहीर आहे. शुक्रवारी सकाळी शेतकरी विहिरीवरील वीज पंप सुरू करण्यासाठी गेले असताना विहिरीत बिबट्या पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागासह रेस्क्यू टीमचे पथक त्याठिकाणी दाखल झाले. या पथकाने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला त्यामध्ये कोंडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याने पिंजऱ्यावरून थेट विहिरीच्या सळईने तयार केलेल्या पायऱ्यांवर झेप टाकून तेथून बाहेर उडी घेतली. त्यानंतर तो शिवारात पसार झाला. संबंधित बिबट्या मादी जातीचा असून अडीच ते तीन वर्ष वयाचा असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडे केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्याforest departmentवनविभाग