शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भोंगे लावायचे की ठेवायचे, या मुद्द्यापेक्षा झाडे लावलेले परवडणारे - रामराजे नाईक-निंबाळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 14:10 IST

शौचालय असेल, तर निवडणूक लढण्याचा कायदा आला. त्यानंतर, दोन अपत्य असतील, तर निवडणूक लढविण्याचा कायदा आला. आता घरापुढे झाडे असतील, तर निवडणुका लढवण्याचा कायदा आला पाहिजे.

फलटण : भोंगे लावायचे की ठेवायचे, या मुद्द्यापेक्षा झाडे लावलेले परवडणारे आहे. आज सर्व देशांपुढे जागतिक तापमान वाढीचे जे संकट ओढावले आहे, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. झाडे लावून त्याचा समतोल टिकविणे गरजेचे असून, वृक्षचळवळीचा वेगळा फलटण पॅटर्न करून दाखविणार असल्याची घोषणा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट, फलटण यांच्या वतीने इरिगेशन कॉलनी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते प्रा.सुधीर इंगळे, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.रामराजे म्हणाले, शासनाने वनविभागाला वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिले असले, तरी हे उद्दिष्ट आपण सातारा जिल्ह्यात सर्वांनी एकत्र येऊन साध्य केले पाहिजे. फलटणमध्ये हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आमच्या संस्था व इतरांना बरोबर घेऊन वृक्षारोपणाची वेगळी चळवळ उभी करून फलटण पॅटर्न उभारणार आहोत. ज्या पद्धतीने मागील काळात पाणी चळवळ राबविली गेली, त्या पद्धतीने आमीर खानला वृक्षारोपण चळवळीबाबत पुढे करणार असून, फिल्मी कलाकारांचे ग्लॅमर प्राप्त करणे, या चळवळीसाठी गरजेचे बनल्याचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.शौचालय असेल, तर निवडणूक लढण्याचा कायदा आला. त्यानंतर, दोन अपत्य असतील, तर निवडणूक लढविण्याचा कायदा आला. आता घरापुढे झाडे असतील, तर निवडणुका लढवण्याचा कायदा आला पाहिजे. झाडे लावली, तर तिकिटे दिली पाहिजेत. आता तर भोंगे लावायचे की ठेवायचे, यापेक्षा झाडे लावणे परवडणार असून, राजकारण राजकारणाच्या पातळीवर ठेवून सर्वांनी वृक्षलागवडीच्या चळवळीकडे लक्ष देऊन पर्यावरणाचा समतोल राखावा, असे आवाहन यावेळी रामराजे यांनी केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकर