सहकार कळतं की नाही, हे कृतीतून दाखवले : पाटील

By Admin | Updated: May 30, 2016 00:42 IST2016-05-29T22:06:43+5:302016-05-30T00:42:03+5:30

टिळक हायस्कूल येथे ‘कृष्णाकाठ’ यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृहाचे उद्घाटन

Whether the co-workers know, showed this through action: Patil | सहकार कळतं की नाही, हे कृतीतून दाखवले : पाटील

सहकार कळतं की नाही, हे कृतीतून दाखवले : पाटील

कऱ्हाड : ‘सरकार ज्यावेळी सत्तेवर आले, तेव्हा सर्वांना वाटले की यांना काय सहकार कळणार. त्यांच्याकडून काय होणार नाही; मात्र सत्तेवर येताच सहकार हे कळतंही आणि वळतंही हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवले. आज दोन वर्षांत सरकारने खूप बदल केले आहेत,’ असे प्रतिपादन सहकार, पणन, वस्त्रोद्योग व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
कऱ्हाड येथे रविवारी शिक्षण मंडळच्या टिळक हायस्कूलमधील विशेष शासकीय अनुदानातून बांधण्यात आलेल्या ‘कृष्णाकाठ’ या यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृहाचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार आनंदराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण गोडबोले, शिक्षण मंडळ कऱ्हाडचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, उपाध्यक्षा शिल्पा वाळिंबे, टिळक हायस्कूलचे मुख्याध्यापक गो. गो. अहिरे, सेके्रटरी चंद्रशेखर देशपांडे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री पाटील म्हणाले, ‘सभागृहाच्या अपूर्ण राहिलेल्या कामासाठी शासनाकडे तत्काळ प्रस्ताव पाठवा, तो मान्य करत उरलेल्या कामासाठी निधी दिला जाईल. आज आगामी काळात कौशल्य शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्र हे करिअरचे क्षेत्र म्हणून प्रसिद्धीस येत असल्याने या क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी प्रगती करणे महत्त्वाचे
आहे.’
शिक्षण मंडळ कऱ्हाडचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. संजीव चिवटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Whether the co-workers know, showed this through action: Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.