शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

कुठे पळाले उरमोडीचे पाणी?

By admin | Updated: August 28, 2015 22:41 IST

शेखर गोरेंचा सवाल : धमक्यांना भीक न घालता कार्यकर्त्यांनी लढविली खिंड

म्हसवड : विद्यमान आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उरमोडीच्या पाण्याचे नाटक करून जनतेची दिशाभूल करून मते मिळविली. आता कुठे गेले उरमोडीचे पाणी? आता आठ दिवसांत उरमोडीचे पाणी आणणार होता. महिना उलटून गेला, कधी आणणार पाणी? असा प्रश्न उपस्थित करून हा बहाद्दर म्हणतो, शेखर गोरे आता तुरुंगात गेलाय त्याला मी दोन वर्षे बाहेर येऊ देणार नाही, तेव्हा आता तुम्हाला वाली कोण? माझ्या विरोधात ग्रामपंचायतीला पॅनेल टाकले तर बघून घेईन, अशा धमक्या दिल्या होत्या; परंतु कार्यकर्त्यांनी मी न्यायालयीन प्रक्रियेत अडकलो असतानाही ग्रामपंचायत निवडणुकीची खिंड लढविली व सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेऊन ती खिंड जिंकली,’ असे प्रतिपादन ‘रासप’चे शेखर गोरे यांनी केले.कुळकजाई, ता. माण येथे श्रीपालवन येथे शिंदी खुर्द, कुळकजाई ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार व ग्रामस्थांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी किसनराव नलवडे, नागेश बर्गे, बाळासो कदम, अण्णासो कोळी, सोपान पवार, धनाजी कदम, अण्णासो जगदाळे, हणमंत मोहिते, बशीर मुलाणी, कुमार पोनेकर, अमर कुलकर्णी, शिवाजीराव घाडगे, डॉ. सुनील घाडगे, नामदेव शिंदे, दिलीप कदम, रजत मगर, वामनराव कदम, जोतिराम पवार, विठ्ठल जाधव, नामदेव चव्हाण, बापूराव नलवडे, आबासो जगदाळे, हणमंत पवार, महेश पोनेकर, अप्पासो बुधावले तसेच कुळकजाई पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. ‘विधानसभा निवडणुकीत जनतेने माझ्यावर विश्वास टाकल्यामुळेच मी नंबर दोनची मते मिळवू शकलो. त्यानंतर विकास सेवा सोसायट्या, ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व मिळवू शकलो. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत तात्यांना शब्द दिला होता, तो मी प्रामाणिकपणे पाळला; परंतु राष्ट्रवादीच्या कुटील कारस्थानामुळे व माण तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षातील काही गद्दारांमुळे आमदार जयकुमार गोरे हे जिल्हा बँकेचे संचालक होऊ शकले. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकींसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे,’ असे आवाहनही यावेळी केले. (प्रतिनिधी)राजकारण सोडेन; पण जयकुमारसोबत नाहीज्यांच्या विरोधात आम्ही राजकारण लढत आहोत, त्यांच्यासोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही, आणि तसा प्रसंग आला तर राजकारण सोडेन; पण युती करणार नाही, अशी प्रतिक्रिया पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘माझा विरोधक नेमका कोण आहे, हे तालुक्याला माहिती आहे. त्यामुळे युती होण्याचा प्रश्नच येत नाही. हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला असेल, याची मला कल्पना नव्हती. वेळप्रसंगी राजकारणातून संन्यास घेईन; पण लोकांच्या भावनांचा आदर करून घेईन.