कुठे पळाले उरमोडीचे पाणी?

By Admin | Updated: August 28, 2015 22:41 IST2015-08-28T22:41:11+5:302015-08-28T22:41:11+5:30

शेखर गोरेंचा सवाल : धमक्यांना भीक न घालता कार्यकर्त्यांनी लढविली खिंड

Where is the water of Urmodi? | कुठे पळाले उरमोडीचे पाणी?

कुठे पळाले उरमोडीचे पाणी?

म्हसवड : विद्यमान आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उरमोडीच्या पाण्याचे नाटक करून जनतेची दिशाभूल करून मते मिळविली. आता कुठे गेले उरमोडीचे पाणी? आता आठ दिवसांत उरमोडीचे पाणी आणणार होता. महिना उलटून गेला, कधी आणणार पाणी? असा प्रश्न उपस्थित करून हा बहाद्दर म्हणतो, शेखर गोरे आता तुरुंगात गेलाय त्याला मी दोन वर्षे बाहेर येऊ देणार नाही, तेव्हा आता तुम्हाला वाली कोण? माझ्या विरोधात ग्रामपंचायतीला पॅनेल टाकले तर बघून घेईन, अशा धमक्या दिल्या होत्या; परंतु कार्यकर्त्यांनी मी न्यायालयीन प्रक्रियेत अडकलो असतानाही ग्रामपंचायत निवडणुकीची खिंड लढविली व सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेऊन ती खिंड जिंकली,’ असे प्रतिपादन ‘रासप’चे शेखर गोरे यांनी केले.कुळकजाई, ता. माण येथे श्रीपालवन येथे शिंदी खुर्द, कुळकजाई ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार व ग्रामस्थांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी किसनराव नलवडे, नागेश बर्गे, बाळासो कदम, अण्णासो कोळी, सोपान पवार, धनाजी कदम, अण्णासो जगदाळे, हणमंत मोहिते, बशीर मुलाणी, कुमार पोनेकर, अमर कुलकर्णी, शिवाजीराव घाडगे, डॉ. सुनील घाडगे, नामदेव शिंदे, दिलीप कदम, रजत मगर, वामनराव कदम, जोतिराम पवार, विठ्ठल जाधव, नामदेव चव्हाण, बापूराव नलवडे, आबासो जगदाळे, हणमंत पवार, महेश
पोनेकर, अप्पासो बुधावले तसेच कुळकजाई पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
‘विधानसभा निवडणुकीत जनतेने माझ्यावर विश्वास टाकल्यामुळेच मी नंबर दोनची मते मिळवू शकलो. त्यानंतर विकास सेवा सोसायट्या, ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व मिळवू शकलो. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत तात्यांना शब्द दिला होता, तो मी प्रामाणिकपणे पाळला; परंतु राष्ट्रवादीच्या कुटील कारस्थानामुळे व माण तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षातील काही गद्दारांमुळे आमदार जयकुमार गोरे हे जिल्हा बँकेचे संचालक होऊ शकले. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकींसाठी कार्यकर्त्यांनी
सज्ज राहावे,’ असे आवाहनही यावेळी केले. (प्रतिनिधी)


राजकारण सोडेन; पण जयकुमारसोबत नाही
ज्यांच्या विरोधात आम्ही राजकारण लढत आहोत, त्यांच्यासोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही, आणि तसा प्रसंग आला तर राजकारण सोडेन; पण युती करणार नाही, अशी प्रतिक्रिया पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘माझा विरोधक नेमका कोण आहे, हे तालुक्याला माहिती आहे. त्यामुळे युती होण्याचा प्रश्नच येत नाही. हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला असेल, याची मला कल्पना नव्हती. वेळप्रसंगी राजकारणातून संन्यास घेईन; पण लोकांच्या भावनांचा आदर करून घेईन.

Web Title: Where is the water of Urmodi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.