वेळे : आशियाई महामार्गावर रस्ते विकास प्राधिकरणाकडून अनेक ठिकाणी आवश्यक सेवा उपलब्ध केल्या आहेत. त्यामध्ये गावालगत महामार्गावर मधोमध विजेचे दिवेही लावण्यात आले. या दिव्यांमुळे रस्ता उजळला. मात्र, वीजवाहन तारा उघड्यावर असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.
वाई तालुक्यातील वेळे येथे पथदिव्यांचे काम योग्य पद्धतीने करण्यात आले नाही. खांबांना जोडण्यात आलेल्या वीजवाहक तारा काही ठिकाणी छेद रस्त्यात पुरून नेल्या आहेत, तर काही ठिकाणी या उघड्या पडल्या आहेत. या मार्गावरून पादचारी, तसेच वाहनांची सतत रेलचेल सुरू असते.
उघड्या पडलेल्या तारांमधून वीजप्रवाह सुरू झाल्यास त्याचा एखाद्याला शॉक बसून विपरित घटना घडू शकते. त्यामुळे रस्ते प्राधिकरणाने याकडे त्वरित लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनधारकांमधून केली जात आहे.
फोटो : १५ वेळे
वाई तालुक्यातील वेळे-सोळशी मार्गावरील दुभाजकात वीजवाहक तारा अशा उघड्या पडल्या आहेत. (छाया : अभिनव पवार)