शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्अ‍ॅपवरील मैत्री बँड व्यावसायिकाला भोवली, ९ लाखांचा ऐवज लाटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:06 IST

व्हॉट्सअ‍ॅपवर मैत्री करून एका युवतीने बँड व्यावसायिकाला ठोसेघरला फिरण्यासाठी नेले. या ठिकाणी अचानक संबंधित युवतीच्या कथित भावांची एन्ट्री होऊन बँड व्यावसायिकाचे त्यांनी अपहरण केले. विविध ठिकाणी फिरवून बँड व्यवसायाकडून अडीच लाखांची रोकड, पाच अंगठ्या आणि कार घेऊन संबंधित टोळक्याने पलायन केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एका युवतीसह पाचजणांवर खंडणी, अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देव्हॉट्अ‍ॅपवरील मैत्री बँड व्यावसायिकाला भोवली, ९ लाखांचा ऐवज लाटला मैत्रिणीने नेले ठोसेघरला; कथित भावांनी अचानक एन्ट्री करून केले अपहरण

सातारा : व्हॉट्सअ‍ॅपवर मैत्री करून एका युवतीने बँड व्यावसायिकाला ठोसेघरला फिरण्यासाठी नेले. या ठिकाणी अचानक संबंधित युवतीच्या कथित भावांची एन्ट्री होऊन बँड व्यावसायिकाचे त्यांनी अपहरण केले. विविध ठिकाणी फिरवून बँड व्यवसायाकडून अडीच लाखांची रोकड, पाच अंगठ्या आणि कार घेऊन संबंधित टोळक्याने पलायन केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एका युवतीसह पाचजणांवर खंडणी, अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुधाकर बाबूराव गेजगे (वय ४३, रा. माळवाडी, लाटे, ता. बारामती) यांचे बँड पथक आहे. ४ डिसेंबरला त्यांच्या व्हॉट्अ‍ॅपर एका युवतीचा मेसेज आला. त्या युवतीने त्यांना तुम्हाला भेटायचे आहे, असे सांगितले. त्यानुसार संबंधित युवतीने सातारा बसस्थानकात त्यांना भेटण्यासाठी बोलावले.

६ डिसेंबर २०१९ रोजी सुधाकर गेजगे हे सातारा बसस्थानकात आले. त्यावेळी संबंधित युवतीने आपण फिरायला ठोसेघरला जाऊ, असे सांगितले. त्यामुळे दोघेही कारने ठोसेघरला गेले. तेथे गेल्यानंतर संबंधित युवतीने लॉज बूक केला. त्या लॉजवर दोघे थांबले असतानाच माझा बाहेर दादा आलाय, असे त्या युवतीने गेजगेंना सांगितले.

चारजण अचानक लॉजमध्ये आले. त्यांनी माझ्या बहिणीसोबत काय करतोय, असे म्हणत गेजगेंना मारहाण केली. त्यांच्याच कारमधून गेजगेंना कोरेगावला नेले. या ठिकाणी आणखी एक युवक आला. त्या युवकानेही गेजगेंना मारहाण केली. त्यांच्याकडून ५ सोन्याच्या अंगठ्या, २ लाख ५६ हजारांची रोकड आणि त्यांची कार घेऊन त्यांनी पलायन केले.या प्रकारानंतर गेजगे यांनी कोठेही वाच्यता केली नाही. भीतीपोटी त्यांनी हा प्रकार पोलिसांनाही सांगितला नाही. दरम्यान, दहिवडी परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी मारामारी झाली होती. त्या ठिकाणी संबंधित हल्लेखोर कार घटनास्थळी ठेवून पसार झाले होते. दहिवडी पोलिसांनी कार मालकाचा शोध घेतल्यानंतर गेजगे यांचे नाव समोर आले.

पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्या बाबतीत घडलेला प्रकार त्यांनी पोलिसांसमोर कथन केला. त्यानंतर गेजगे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पैलवान उर्फ नितीन खरात, अनिल मदने (रा. पुसेगाव, ता. खटाव), सनीदेव खरात (रा. शिंदी, ता. माण), मुन्ना मुन्ना (रा. खातगुण, ता. खटाव, जि. सातारा) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे सर्व संशयित फरार झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरWhatsapp Loveव्हॉट्सअॅप लव्ह