राणेंचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:44 IST2021-08-25T04:44:07+5:302021-08-25T04:44:07+5:30
सातारा : साताऱ्यात शिवसैनिकांनी मोर्चा काढून नारायण राणेंच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. नारायण राणे कोंबडी चोर.., या राणेंचं ...

राणेंचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय...
सातारा : साताऱ्यात शिवसैनिकांनी मोर्चा काढून नारायण राणेंच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. नारायण राणे कोंबडी चोर.., या राणेंचं करायचे काय.. खाली मुंडी वर पाय.., नारायण राणेंचा निषेध असो... अशी घोषणाबाजी केली. यावेळी सातारा शहर पोलीस ठाण्यात नारायण राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे शिवसैनिकांत संतापाची लाट उसळली आहे. संपूर्ण राज्यभर याचे पडसाद उमटले असून, साताऱ्यातही संतप्त शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्री राणे यांच्या निषेधाच्या घोषणा देत शहरातील मोती चौक ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. तसेच पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन सातारा शहर पोलीस ठाण्यात नारायण राणेंच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
यावेळी जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, तालुकाप्रमुख आशिष ननावरे, अनिल गुजर, शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, नीलेश कोरे, शिवाजीराव इंगवले, सयाजी शिंदे, नितीन लोकरे, रमेश बोराटे आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. नारायण राणेंना तातडीने अटक करावी, अशी मागणीही यावेळी शिवसैनिकांनी केली.
फोटो : २४सातारा-राणे
सातारा येथील मोदी चौकामध्ये शिवसैनिकांनी हातामध्ये कोंबडा घेऊन नारायण राणे यांचा निषेध केला. (छाया : जावेद खान)