बजेटने मला काय दिले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST2021-02-05T09:12:24+5:302021-02-05T09:12:24+5:30

कोरोनानंतर एसटीच्या प्रगतीची दिशाच बदलली. विविध मार्गावर जादा गाड्या सुरू केल्या, पण डिझेलचा खर्च तरी निघेल ना, याची खात्री ...

What did the budget give me ...! | बजेटने मला काय दिले...!

बजेटने मला काय दिले...!

कोरोनानंतर एसटीच्या प्रगतीची दिशाच बदलली. विविध मार्गावर जादा गाड्या सुरू केल्या, पण डिझेलचा खर्च तरी निघेल ना, याची खात्री नसल्याने एसटी प्रशासन चिंतेत आहे. किती उत्पन्न आले पाहिजे याचे उद्दिष्ट वाहकाला ठरवून दिले जाते. सोमवारी चालक-वाहकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत, डिझेल दराचे काय झाले, याचीच चर्चा सातारा मध्यवर्ती बसस्थानकात दिवसभर रंगली होती. डिझेलवर सेस लावला म्हणजे काय? हे माहीतगारांना फोन करून विचारत होते.

रेल्वे स्टेशन

रेल्वेचे जनरल डबे अजून जोडलेले नसल्याने सामान्य प्रवाशांची वर्दळ कमी झालेली असली तरी, नोकरीनिमित्ताने काही तरुण आगावू आरक्षण करून प्रवास करतात. त्यांच्यामध्ये पंधरा वर्षे जुनी वाहने भंगारात काढण्याच्या निर्णयावर चर्चा रंगली होती. यामध्ये केवळ चारचाकी वाहने असावीत, की दुचाकीही, यावर अनेक मतप्रवाह येत होते.

Web Title: What did the budget give me ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.