बुध येथील विहीर कॉन्ट्रॅक्टरचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:41 IST2021-05-11T04:41:33+5:302021-05-11T04:41:33+5:30

पुसेगाव : बुध (ता. खटाव) येथील विहीर बांधकामाचा ठेका घेणाऱ्या एका व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. नंदकुमार सातपुते ...

Well contractor dies at Mercury | बुध येथील विहीर कॉन्ट्रॅक्टरचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

बुध येथील विहीर कॉन्ट्रॅक्टरचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

पुसेगाव : बुध (ता. खटाव) येथील विहीर बांधकामाचा ठेका घेणाऱ्या एका व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. नंदकुमार सातपुते (वय ३४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पुसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश सातपुते यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ललगुण (ता. खटाव) येथील घाडगे मळा शिवारात सुरू असलेल्या विहिरीच्या कामावर विद्युत पंप सुरू करताना विजेचा धक्का लागल्याने नंदकुमार सातपुते हे जागीच बेशुद्ध पडले. तातडीने त्यांना पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. येथील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांना देण्यात आला. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस हवालदार एस. आर. माने अधिक तपास करीत आहेत.

आयकार्ड फोटो....

१०नंदकुमार सातपुते

Web Title: Well contractor dies at Mercury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.