माऊलींचे काळज, सुरवडी, मलटणमध्ये जल्लोशी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST2021-07-20T04:26:45+5:302021-07-20T04:26:45+5:30
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा यावर्षी ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीने न जाता शिवशाही एसटी बसने आळंदीहून पंढरपूरकडे निघाला. या ...

माऊलींचे काळज, सुरवडी, मलटणमध्ये जल्लोशी स्वागत
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा यावर्षी ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीने न जाता शिवशाही एसटी बसने आळंदीहून पंढरपूरकडे निघाला. या वेळी फलटण तालुक्यातील काळज, सुरवडी, वडजल, मलटण येथे त्याच जल्लोशी भक्तिमय वातावरणात माऊलींच्या पादुकांचे स्वागत करण्यात आले. सर्व प्रथम काळज व सुरवडी गावच्या सीमेवर जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील व सुरवडीचे सरपंच जितेंद्र साळुंखे पाटील यांनी पूजन करून स्वागत केले तांबमाळ येथे नगरसेवक अशोक जाधव व फलटण वारकरी संप्रदाय यांनी टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोष करत स्वागत केले. या वेळी अनेक फलटणकर नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून शिवशाही बसवर पुष्पवृष्टी करत होते. मलटण येथे ही व्यापारी व नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती माउलींच्या दर्शनाने भक्त हरखून गेले होते. काही क्षणांचे का होईना दर्शन प्राप्त झाल्याने नागरिकांना पंढरी मिळाल्याचा आनंद झाला होता. पुढे शिवशाही बस फलटणमार्गे विडणीकडे मार्गस्थ झाली या वेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.