कोपर्डी निकालाचे जिल्ह्यात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:11 IST2017-11-29T23:11:57+5:302017-11-29T23:11:57+5:30

कोपर्डी निकालाचे जिल्ह्यात स्वागत
कºहाड : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिच्या खूनप्रकरणी तिन्ही नराधम गुन्हेगारांना बुधवारी विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाचे कºहाड येथे मराठा क्रांती समन्वय समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.
येथील दत्तचौकात बुधवारी सायंकाळी पाच वाजता समन्वय समितीतील कार्यकर्त्यांनी येऊन ‘एक मराठा, लाख मराठा’, जय भवानी, जय शिवाजी’ आदी घोषणा देत आनंद साजरा केला. यावेळी सचिन नलवडे, रघुनाथ डुबल, जीवन जाधव, संदीप साळुंखे, सचिन पाटील, विक्रम पाटील, अनिल घराळ यांच्यासह मराठा क्रांती समन्वय समितीतील पदाधिकारी उपस्थित होते.
मुलीवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाने दिलेला निकाल हा योग्य असून, शिक्षा सुनाविण्यात आलेल्या आरोपींना तत्काळ फाशी द्यावी, अशी मागणी यावेळी समन्वय समितीतील कार्यकर्त्यांनी केली.