बाळूमामाच्या सातनंबर दिंडीचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:41 IST2021-05-21T04:41:40+5:302021-05-21T04:41:40+5:30
खटाव : खटावमध्ये बाळूमामाच्या सात नंबर दिंडीचे कोरोनाचे नियमांचे पालन करून स्वागत करण्यात आले. श्री संत बाळूमामा यांच्या चारशे ...

बाळूमामाच्या सातनंबर दिंडीचे स्वागत
खटाव : खटावमध्ये बाळूमामाच्या सात नंबर दिंडीचे कोरोनाचे नियमांचे पालन करून स्वागत करण्यात आले.
श्री संत बाळूमामा यांच्या चारशे मेंढरांसह या दिंडीचे खटावमध्ये आगमन झाले.
कोरोनाच्या या प्रसंगात शासनाने घातलेले निर्बंध व नियमांचे काटेकोरपणे पालन करताना या दिंडीतील युवक व सहभागी वारकरी दिसून येत होते. यावेळी एक मात्र पाहावयास मिळाले की, ज्या ठिकाणी त्यांना मेंढराकरिता जागा उपलब्ध करून दिली होती, त्या तळावर कडक शिस्त, कोरोना नियमावलीचे पालन या दिंडीचे चालक व सहभागी युवक करीत होते. या दिंडीचे नित्यनेमाने होणारे धार्मिक कार्यक्रम म्हणजे सकाळी साडेनऊ वाजता बाळूमामाची आरती, यावेळी आरतीकरिता जेवढे उपस्थित भाविक असतील, त्यांनी नियमांचे पालन करत गर्दी न करता आरती झाल्यानंतर रांगेत उभे राहून बाळूमामाचे पादुका व असलेल्या तसबिरीचे रथातून दर्शन घेतले. तर रात्रीच्या वेळी बाळूमामाच्या कार्याचे महत्त्व सांगणाऱ्या धार्मिक गाण्याने त्या तळाला एक वेगळेपण निर्माण झाले होते. अनेक भाविकांनी कोरोनाचे संकट लवकरात लवकर घालविण्यासाठी श्री संत बाळूमामा यांच्याकडे साकडे घेतल्याचे चर्चा सुरू होती.
दिंडीत सहभागी असलेल्यांना तसेच उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.
कॅप्शन : खटावमध्ये बाळूमामाच्या दिंडीतील सात नंबरच्या दिंडीचे स्वागत.