भारनियमन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:12 IST2021-02-18T05:12:50+5:302021-02-18T05:12:50+5:30

सातारा : शहरात अनेक दिवसांनंतर विद्युत भारनियमन दर मंगळवारी सुरू झाले आहे. हा दुसरा आठवडा आहे. वेगवेगळ्या भागात वेगवेगळे ...

Weight regulation continues | भारनियमन सुरूच

भारनियमन सुरूच

सातारा : शहरात अनेक दिवसांनंतर विद्युत भारनियमन दर मंगळवारी सुरू झाले आहे. हा दुसरा आठवडा आहे. वेगवेगळ्या भागात वेगवेगळे वेळापत्रक तयार केले आहे. यामध्ये संबंधित भागात किती वाजता भारनियमन असेल याबाबत संबंधित ग्राहकांना एक दिवस अगोदरच मोबाइलवर मेसेज पाठविले जाते आहेत.

००००००००००

दुचाकी रॅली

सातारा : येथील हिरकणी रायडर्स ग्रुपच्या वतीने शिवजयंतीनिमित्ताने शुक्रवार, दि. १९ रोजी दुचाकी रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मनीषा फरांदे, रेणू येळगावकर यांनी प्रिसद्धी पत्रकाद्वारे दिली. या रॅलीस पहाटे ४ वाजता शिवतीर्थावरून प्रारंभ होणार आहे. ही रॅली किल्ले पुरंदरवर जाणार आहे. तेथून शिवज्योत आणली जाणार आहे. यादरम्यान अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

००००००००००

टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा

सातारा : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्वच चारचाकी तसेच अवजड वाहनांना फास्टॅग सक्तीचे केले आहे. तसेच ज्यांच्याकडे फास्टॅग नसेल त्यांना दुप्पट टोल आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी तसेच तासवडे टोलनाक्यावर गेल्या दोन दिवसांपासून वाहनांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत.

००००००००००

वाहनचालकांचे वाद

सातारा : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल आकारणी करण्याबाबत निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र दुप्पट टोल भरण्यास वाहनचालक तयार नसून ते टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत. त्यामुळे जास्त वेळ समजूत घालण्यात जात आहे.

००००००००

नटराज मंदिरास भेट

सातारा : श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरास पूर्णवाद परिवाराच्या लक्ष्मीकांत पारनेरकर महाराज याम यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग, उषा शानभाग, मंदिराचे विश्वस्त नारायण राव, मुकुंद मोघे, रणजित सावंत, रमेश हलगेकर उपस्थित होते. महाराजांनी मंदिराला विशेष स्वरुपात देणगी दिली.

मारुती पिसे यांची सचिवपदी निवड

सातारा : भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा ओबीसी सेलच्या सचिवपदी वडगाव जयराम स्वामी येथील मारुती पिसे यांची निवड करण्यात आली. सातारा येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, वनिता लोंढे, भारत जत्रे, विठ्ठल बलशेटवार उपस्थित होते.

००००००००

कोरोनामुळे चिंतेत भर

सातारा : जिल्ह्यातील पाचवी ते नववीपर्यंत वर्ग सुरू झाले आहेत. शाळेस मुलांना पाठविण्यास तयार असल्याचे पालकांनी संमतीपत्रही दिले आहेत. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला असल्याने पालकांच्या चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे ते मुलांना शाळेत गेल्यानंतर योग्य ती खबरदारी कशी घ्यायचे हे सांगत आहेत.

---

मुलं अभ्यासात

सातारा : दहावी, बारावीचे वर्ष हे मुलांसाठी खूप महत्त्वाचे समजले जाते. मात्र यंदा कोरोनामुळे यावर पाणी फिरले. शाळाच बंद असल्याने बहुतांश महिने घरातूनच ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागले. आता परीक्षा काही महिन्यांवर आली असल्याने मुलं अभ्यासाला लागली आहेत. अनेकजण गावाबाहेर शांत ठिकाणी जाऊन अभ्यास करत असल्याचे चित्र आहे.

००००००००

रस्ता सुरक्षा सप्ताहात भरमगुंडे यांचा गौरव

सातारा : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व सातारा सायक्लिंग ग्रुपतर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित केला होता. यामध्ये ३२ किलोमीटरच्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभाग घेतल्याबद्दल गोविंद भरमगुंडे यांचा गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते भरमगुंडे यांना पदक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

००००००००००

प्रदूषणामध्ये वाढ

सातारा : साताऱ्यात गेल्या वर्षी चार महिने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे वाहने घरात असल्याने प्रदूषण कमी झाले होते. जंगली प्राणी शहरात येत होते. मात्र आता अनलॉकनंतर वाहनांचा वापर वाढला असल्याने ध्वनी व वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.

०००००००००

डोंगर बनताहेत भकास

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख डोंगरांवरील गवत अज्ञात व्यक्ती पेटवून देत आहेत. त्यामुळे अनेक डोंगर भकास होऊ लागली आहेत. या वणव्यामुळे जीवजंतू नष्ट झाले असून, जंगलातील प्राण्यांनाही खाण्यासाठी पान, फुलं मिळत नाही. त्यामुळे ते शहरात येत आहेत.

Web Title: Weight regulation continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.