पूर्ववैमनस्यातून एकावर शस्त्राने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:38 IST2021-04-13T04:38:11+5:302021-04-13T04:38:11+5:30
सागर पांडुरंग रजपूत (वय ४०, रा. खेड, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. लक्ष्मण तुकाराम ...

पूर्ववैमनस्यातून एकावर शस्त्राने वार
सागर पांडुरंग रजपूत (वय ४०, रा. खेड, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. लक्ष्मण तुकाराम जाधव (रा. घारेवाडी, ता. कऱ्हाड) याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर चंद्रकांत बाजारे (रा. गजानन हौसिंग सोसायटी) यांनी याबाबतची फिर्याद कऱ्हाड शहर पोलिसात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन हौसिंग सोसायटीत प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्र आहे. याठिकाणी सागर रजपूत व लक्ष्मण जाधव हे कामास आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून वाद होता. या वादातून रविवारी रात्री लक्ष्मण जाधव याने धारदार शस्त्राने वार केले. त्यामध्ये सागर रजपूत जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची नोंद कऱ्हाड शहर पोलिसात झाली आहे. उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.