शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

...तर कोयना धरणात घेणार उडी, प्रकल्पग्रस्तांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 13:53 IST

कोयना प्रकल्पग्रस्तांना महानिर्मिती कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेऊ नये, अशी लेखी सूचना नसतानाही महानिर्मिती कंपनी कोयना प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेण्यास विरोध करीत आहे.

सातारा - कोयना प्रकल्पग्रस्तांना महानिर्मिती कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेऊ नये, अशी लेखी सूचना नसतानाही महानिर्मिती कंपनी कोयना प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेण्यास विरोध करीत आहे. यामुळे कोयना प्रकल्पग्रस्तांनी कोयना व कोळकेवाडी धरणामध्ये उडी घेण्याचा इशारा महानिर्मिती कंपनीला दिला आहे. कोयना धरणाची उभारणी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून झाली आहे आणि याच धरणाच्या जलाशय साठ्यावर २००० एमडब्ल्यू वीजनिर्मिती करणारी कंपनी हे आमचे प्रकल्पग्रस्त नाहीत, असे स्पष्ट करीत असेल तर हे कोयना प्रकल्पग्रस्तांचे दुर्दैवच म्हणावे लागेल, असे  सांगत नंदकुमार सुर्वे म्हणाले की, महाराष्ट्र शासन शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेत असताना केवळ स्वार्थापोटी कार्यकारी संचालक विनोद बोंद्रे सर्वांची दिशाभूल करीत आहेत. कलम ४ (१)च्या नोटीसची निर्मिती कशी होते, याची अक्कल नसणारे महानिर्मिती कंपनीचे अधिकारी कोयना प्रकल्पग्रस्तांकडे कलम ४ (१)ची नोटीस मागत आहेत. 

महानिर्मिती कंपनीचे अधिकारी सर्वांची दिशाभूल करीत आहेत. कारण जिल्हाधिका-यांना लेखी स्वरुपामध्ये कळवतात की, कोयना प्रकल्पाची व्याप्ती आहे. त्यामुळे कोयना प्रकल्पग्रस्तांना महानिर्मिती कंपनीमध्ये सामावून घेण्यासाठी प्रशासकीय अडचणी निर्माण होत आहे. तर दुसऱ्या बाजूला हेच अधिकारी वरिष्ठांना कळवितात की, कोयना प्रकल्पग्रस्तांकडे महानिर्मितीने संपादित केलेल्या मालमत्तेचे पुरावे नसल्याने ते आपले प्रकल्पग्रस्त नाहीत, ही अंदाधुंदी आम्ही सहन करणार नाही, असे सुर्वे यांनी सांगितले.कोयना प्रकल्पग्रस्त तरुण २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी महानिर्मिती कंपनी, पोफळी या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसले होते. २९ जानेवारीला सायंकाळी कार्यकारी संचालक विनोद बोंद्रे यांनी पत्र दिले की, कोयना प्रकल्पग्रस्त, जलसंपदामंत्री व ऊर्जामंत्री यांच्यासमवेत तत्काळ बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु, आता अनेक दिवस उलटून गेले तरी बैठकीची तारीख नक्की होत नसेल तर टोकाची भूमिका घ्यावीच लागेल, असे मत डॉ. संजय सुर्वे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण