शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

बारामतीकरांची मक्तेदारी माेडून काढू, जयकुमार गोरे यांचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 15:50 IST

बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा मुख्यमंत्री खुर्चीवर बसला आणि महाराष्ट्रावर मोठं संकट आलं.

पाचगणी : ‘यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार समजायचं, त्यांच्याच सातारा जिल्ह्यात त्यांनी आपला पक्ष वाढवला; पण ४० वर्षे पाठीशी राहिलेल्या या सातारा जिल्ह्याला त्यांनी काय दिलं, हा प्रश्न आज ही अनुत्तरित आहे. सर्व विकासकेंद्रे बारामतीला नेली, औंधचं संस्थानही त्यांनी ताब्यात घेतलं. त्यांनी दिलं काय ? आता त्यांची मक्तेदारी मोडून काढण्याची वेळ आली आहे,’ असा घणाघात भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे यांनी केला. भिलार, ता. महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारा जिल्हा भाजपा कार्यकारिणी बैठक आणि दोन दिवसीय अभ्यासवर्ग शिबिराच्या समारोपप्रसंगी जिल्हाध्यक्ष गोरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे म्हणाले, ‘ज्या योजनेतून अनेकांचे जीव वाचले, अनेकांच्या संसाराला हातभार लागला ती मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना बंद करणारा पहिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अथक परिश्रमातून तयार केलेला अर्थसंकल्प वाचताना उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे सुतकी चेहरे पाहण्यासारखे होते. आपण बहुमताने निवडून आलो; पण सत्तेच्या बाहेर राहावं लागलं. बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा मुख्यमंत्री खुर्चीवर बसला आणि महाराष्ट्रावर मोठं संकट आलं. वेदना झाल्या; पण आता विचार करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार यासाठी काम सुरू आहे.’‘पवारांनी संस्थानिक, बँका, सभासद ताब्यात ठेवले आहेत. आपल्या ताब्यात काय आहे ?  त्यांच्या बालेकिल्ल्यातील सातारा जिल्हा बँकेने आजपर्यंत एकही नवा सभासद केला नाही. जिल्ह्यात लढाई विचारांची आहे, ती राष्ट्रवादी बरोबर आहे, त्यांचा पाडाव करण्याची मानसिकता असायला पाहिजे. एवढ्या मोठ्या नेत्यांवर का बोलता ? असं मला अनेकदा सांगितलं जातं; पण मी का कुणाला भ्यावं. मी लोकांसाठी बलिदान दिलं तर बिघडलं कुठं ?  देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत अनोखी ऊर्जा मिळते. प्रत्येक संकटाच्या वेळी फडणवीस पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. प्रत्येक परिस्थितीत मजबुतीने पाठीशी उभा राहणारा भाजप पक्ष आहे, असेही जिल्हाध्यक्ष गोरे यांनी स्पष्ट केले.  यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही मार्गदर्शन केले. दोन दिवस चाललेल्या या मार्गदर्शन शिबिरात विविध मान्यवरांनी कार्यकर्त्यांना विचारांची शिदोरी दिली. या शिबिराला जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शिबिराची जबाबदारी महाबळेश्वर तालुक्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. 

सत्तेच्या बदल्यात जिल्ह्यातील पाणी तिकडं पळवलं...दोन दिवसांच्या या शिबिरातून कार्यकर्त्यांनी सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी  कामाला लागावे. आगामी काळात जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेण्याबरोबरच जिल्ह्यात जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूयात. फलटणकरांनी कायम बारामतीकरांशी गोड बोलून सत्तेची भूक भागवली; पण त्यांच्या सत्तेच्या बदल्यात जिल्ह्यातील पाणी तिकडं पळवलं, हे पाप फलटणकरांनी जिल्ह्याच्या माथी मारलं, असे गोरे म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJaykumar Goreजयकुमार गोरेBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवार