सर्वसामान्य जनतेला सुविधा देण्यासाठी तत्पर राहू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:36 IST2021-08-29T04:36:43+5:302021-08-29T04:36:43+5:30
कोपर्डे हवेली : ‘जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेला सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू,’ अशी ग्वाही जिल्हा ...

सर्वसामान्य जनतेला सुविधा देण्यासाठी तत्पर राहू
कोपर्डे हवेली : ‘जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेला सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू,’ अशी ग्वाही जिल्हा नियोजन समिती सदस्य निवासराव थोरात यांनी दिली.
शिरवडे ता. कऱ्हाड येथे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद साताराचे जिल्हा नियोजन समिती सदस्य निवासराव थोरात यांच्या प्रयत्नातून पंधराव्या वित्त आयोग व जनसुविधा या योजनेअंतर्गत नंदीवाले वस्ती काँक्रीट रस्ता, पहिलवान आण्णा थोरात यांच्या घरापासून ते विश्वनाथ थोरात यांच्या घरापर्यंत गटर काम, अंगणवाडी दुरुस्ती व नवीन स्मशानभूमी बांधणे या कामांचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. या वेळी ते बोलत होते.
थोरात म्हणाले, ‘आपल्या पदाचा वापर सर्वसामान्य जनतेसाठी नेहमीच करीत आलो आहे. यापुढेही पदाच्या माध्यमातून जनतेसाठी अधिकाधिक विकासकामे आणण्याचा प्रयत्न करणार आहे.’
या वेळी शरद चव्हाण, कऱ्हाड उत्तर युवक काँग्रेसचे सरचिटणीस शहानुर देसाई, संदीप बोराटे, दादासाहेब पवार, सुभाष पवार, जयवंत थोरात, संदीप थोरात, संजय जगदाळे, महेश पवार, सदस्य संदीप जगदाळे, अशोक पवार, श्रीमंत पाटील, राजेंद्र थोरात, सुहास थोरात, संतोष मोहिते, शहाजी पवार, व्यंकटेश पवार, आनंदा थोरात, बाजीराव जगदाळे, महेश थोरात आदी उपस्थित होते.
फोटो ओळ
शिरवडे ता. कऱ्हाड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा नियोजन समिती सदस्य निवासराव थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शरद चव्हाण, संदीप बोराटे, दादासाहेब पवार, सुभाष पवार उपस्थित होते.