शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

माझं युवाशक्तीवर भरपूर प्रेम, पण तोंडघशी पाडू नका!, अभिनेते नाना पाटेकरांचे आवाहन

By प्रमोद सुकरे | Updated: October 14, 2022 17:09 IST

संपत्तीची ट्रान्स्फर होईल. पण विचार आणि काम तुमचे तुम्हीच मिळवायचे आहे.

कऱ्हाड : ‘माझं युवाशक्तीवर भरपूर प्रेम आहे. म्हणूनच मी आज या युवा महोत्सवाच्या उद्घाटनाला आलो आहे. तुमच्या सगळ्यांकडून आमच्या भरपूर अपेक्षा आहेत. त्या तुम्ही पूर्ण कराव्यात; पण आम्हाला तोंडघशी पाडू नये,’ असे भावनिक आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.कऱ्हाड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात ४२ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अॅड. रवींद्र पवार, डॉ. आर. व्ही. गुरव, प्राचार्य आर. व्ही. शेजवळ, प्रांताधिकारी उत्तम दिघे, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.पाटेकर म्हणाले, ‘काय करायचे अन् काय नाही करायचे हे तुमच्या हातात आहे. हे तुम्हाला भोवताली समजते. मोबाईल मी माझ्या सोयीसाठी वापरत असतो. हे प्रत्येकाने केले पाहिजे. मोबाईलच्या मोहजालात न अडकता पुस्तके वाचली पाहिजेत. पुस्तकाच्या दोन ओळींच्या मधील आपली जागा आहे, हे लक्षात ठेवा. पूर्वीच्या पत्रांना भावनिक ओलावा होता. अलीकडे तंत्रज्ञानाशिवाय काहीच करता येत नाही. परंतु त्याचा वापर किती करायचा हे आपल्या हातात आहे.शिक्षण म्हणजे स्वतःची वाट चोखाळण्याची पद्धती आहे. माझ्या पलीकडे मी जगू शकतो, याची जाणीव प्रत्येकाच्या मनात सतत असावी. एकमेकास आपण पूरक असले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात टिकून राहण्यापेक्षा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवा. देखणे दिसणे, हे तुमच्या कामावर अवलंबून आहे. तुमच्या पाठीशी असलेली ताकद जोखा. ही ताकद आतमध्ये डोकावून पाहा. आजकाल खिडकी एवढे आभाळ आपल्या वाट्याला आले आहे, हे शोकांतिका आहे.विचार आणि काम तुम्हीच मिळवायचे संपत्तीची ट्रान्स्फर होईल. पण विचार आणि काम तुमचे तुम्हीच मिळवायचे आहे. कॅमेरा बाजूला असताना मी सामान्य माणूस आहे. हीच भावना मी ठेवली होती व आजही ती कायम आहे. आपल्यात जीवनाचे सर्वस्व अर्पण करणारी मंडळी असल्याने समाजात चांगलं टिकून आहे. जे माझं आहे, ते टिकवायचा प्रयत्न झाला पाहिजे. दुसऱ्याची तुलना करू नका.

आई-वडिलांची पूजा करा

तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी खस्ता खाल्या आहेत, याची जाणीव ठेवा. घरातील आई-वडिलांची पूजा करा. तुम्हाला सगळे काही गवसेल. कोणतीही गोष्ट शक्य नाही हे समजू नका. सगळे काही शक्य आहे. स्वतः ला आणि समाजातील एखाद्या घटकाला जगवा. व प्रत्येक गोष्टीत आनंद घेत राहा.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNana Patekarनाना पाटेकर