चांगल्या ऊसदराची आम्हीही वाट पाहतोय!

By Admin | Updated: November 25, 2014 23:47 IST2014-11-25T22:43:33+5:302014-11-25T23:47:04+5:30

शरद पवारांचा टोला : चळवळीत आयुष्य घालविणारेच आज सत्तेत

We are waiting for good lentils! | चांगल्या ऊसदराची आम्हीही वाट पाहतोय!

चांगल्या ऊसदराची आम्हीही वाट पाहतोय!

कऱ्हाड : ‘ऊसदराच्या चळवळीत आयुष्य घालविणारे आज देशात आणि राज्यात सत्तेत सहभागी झाले आहेत़ त्यामुळे यंदापासून उसाला चांगला दर मिळेल. आम्हीही त्या दराची वाट पाहतोय,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी चळवळीतील नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला़
कऱ्हाड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतिस्थळाला अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ ‘उसाला २७०० रूपये दर मिळावा अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मागणी आहे़, तर इतर शेतकरी संघटनांनी ३५०० रूपयापर्यंत दर मागितले आहेत़ पण मग २७०० रूपये पर्यंत पहिली उचल मिळायला हरकत नाही़,’ अशी मिश्किल टिप्पणी शरद पवार यांनी केली़
पवार म्हणाले, ‘गेल्या वर्षी साखर कारखान्यांची दर देण्याची ऐपत नव्हती म्हणून त्यांना केंद्र सरकारकडून मदत देण्याची भूमिका आम्ही घेतली़ राज्याचे सहकारमंत्री जर केंद्राच्या मदतीने चांगला दर देणार असतील, तर ते चांगलेच आहे़’
मराठवाडा, विदर्भामधील दुष्काळी स्थितीबाबत ते म्हणाले, ‘दुष्काळाबाबत राज्य सरकारने अजूनही काही ठोस निर्णय घेतल्याचे दिसत नाही़ केंद्राची मदत हवी असल्यास तसा प्रस्ताव राज्यशासनाने पाठवावा लागतो़ मग केंद्रीय कृषी विभागाची समिती तज्ज्ञांमार्फत पाहणी करते. मग मदतीचा निर्णय होतो; पण याबाबत राज्य सरकारने हालचाली केल्याचे ऐकिवात नाही़ ‘पिण्याचे पाणी, पशुधन, बँक कर्जे, वीज बिले सवलती देण्याबाबत लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे़ दुष्काळाची खरी झळ डिसेंबरनंतर जाणवते. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल,’ (प्रतिनिधी)

Web Title: We are waiting for good lentils!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.