शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'दोन्ही राजे भाजपात गेल्यानं सातारा मुक्त झाला; आता आम्ही छत्रपतींचा वारसा चालवतो!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 11:28 IST

Maharashtra Election 2019: 'उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोन्ही राजे भाजपात गेल्याने आम्ही मुक्त झालो आहोत.'

ठळक मुद्देदोन्ही राजे भाजपात गेल्याने आम्ही मुक्त : लक्ष्मण मानेसातारा आता गरिबांच्या हातात

सातारा : उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोन्ही राजे भाजपात गेल्याने आम्ही मुक्त झालो आहोत. सातारा हा आता गरिबांच्या हातात आला आहे. त्यामुळे आम्ही आता छत्रपतींचा वारसा चालवितो, अशी टीका महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केली.माने यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही राजेंवर जोरदार टीका केली. माने म्हणाले, दोन्ही राजे भाजपात गेले हे बरं झालं. त्यांच्या हातून साताऱ्याचा काडीचाही विकास झाला नाही. आता सातारा पालिकेत तुम्ही लक्ष घालू नका, आम्ही पालिकेत काय करायचं ते पहातो. पूवीर्सारखी राजेशाही आता राहिली नाही. त्यामुळे सर्वच राजेंच्या हातात नारळ द्यायला हवा, अशी बोचरी टीकाही लक्ष्मण माने यांनी यावेळी केली.पंतप्रधान नरेंद्र मोंदीमुळे देशाची आर्थिक स्थिती धोक्यात आली आहे, असे सांगून माने पुढे म्हणाले, काश्मीरमध्ये ३७० कलम हटवलं पण तेथे प्रत्येक घराला सध्या टाळे लागले आहेत. कलम हटविण्यापूर्वी तेथील लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते. तेथे सध्या प्रत्येक घरासमोर सैनिक उभे आहेत.

जनतेमध्ये दहशत आहे. ३७० हटवून त्यांनी राष्ट्रद्रोहच केला आहे. दसऱ्या दिवशी शस्त्रांचे पूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले. अत्याधुनिक यंत्राला दोरा आणि लिंबू ठेवून पूजा करणे हे आधुनिक काळात शोभते का? याचा निषेध म्हणून निवडणूक संपल्यानंतर राजवाड्यावर प्रतापसिंह महाराजांच्या पुतळ्यासमोर शस्त्रांची पूजा करणार असल्याचेही माने यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेsatara-acसाताराsatara-pcसातारा