जवानांमुळेच आपण सर्वजण सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST2021-09-23T04:44:02+5:302021-09-23T04:44:02+5:30
धामणी (ता. पाटण) येथे विठ्ठल-रखुमाई उत्सव मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या वृक्षारोपण व माजी सैनिक आनंदा दिंडे यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमप्रसंगी ...

जवानांमुळेच आपण सर्वजण सुरक्षित
धामणी (ता. पाटण) येथे विठ्ठल-रखुमाई उत्सव मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या वृक्षारोपण व माजी सैनिक आनंदा दिंडे यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच आशाताई नेर्लेकर, डॉ. संदीप डाकवे, सचिन सावंत, बाजीराव सावंत, संजय सावंत, अशोक सावंत, अनिल दिंडे, धनाजी सावंत उपस्थित होते.
सेवानिवृत्त जवानांनी गावातील मुलांना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत. गावाला मार्गदर्शन करावे. गावातील युवकांनीही देशासाठी योगदान देण्याची तयारी ठेवावी. जवानांचा आदर्श घेऊन सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी नरेंद्र पाटील यांनी केले.
दरम्यान, यावेळी सेवानिवृत्त सैनिक अशोक दिंडे यांनी विविध ठिकाणी केलेल्या सेवेचा गौरवही यावेळी करण्यात आला. पोलीसपाटील विजय सुतार, संजय सावंत, विनोद कदम यांचाही सन्मान करण्यात आला. डॉ. संदीप डाकवे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल दिंडे, दीपक दिंडे व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विषेश परिश्रम घेतले.
फोटो : २२केआरडी०१
कॅप्शन : धामणी (ता. पाटण) येथे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे फौंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याहस्ते सेवानिवृत्त सैनिक अशोक दिंडे यांचा गौरव करण्यात आला.