‘कऱ्हाड उत्तर’मध्ये परिवर्तनाची लाट
By Admin | Updated: August 14, 2014 22:38 IST2014-08-14T21:12:17+5:302014-08-14T22:38:06+5:30
बिनकामाचा डंका

‘कऱ्हाड उत्तर’मध्ये परिवर्तनाची लाट
कऱ्हाड : ‘कऱ्हाड उत्तरमध्ये विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची लाट आली असून, यांची सुरुवात कोपर्डे काशीळ , ता. सातारा येथून आम्ही धैर्यशील कदमांच्या पाठीशी राहून करणार आहोत,’ असे मत कोपर्डे काशीळचे सरपंच संजय कदम यांनी केले.
कऱ्हाड उत्तर राष्ट्रीय काँग्रेसचा संवाद यात्रेदरम्यान मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी धैर्यशील कदम, हिंदुराव चव्हाण, सुदाम दीक्षित, भीमराव डांगे, पृथ्वीराज निकम, भरत जाधव, सत्वशील कदम, पंचायत समिती सदस्या प्रतिभा भोसले, महेश घार्गे, अविनाश साळुंखे, जितेंद्र भोसले, उमेश ताटे, दत्तात्रय काशीद, अक्षय डुबल, गोल्डन पवार, सागर शिवदास, सुनील जाधव उपस्थित होते.धैर्यशील कदम म्हणाले, ‘सातारा तालुक्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आनंदराव पाटील यांच्या माध्यमातून सुमारे ३.५० कोटींचा भरीव निधी देण्यात यशस्वी झालो. मी देखील तुमच्या सारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता आहे. लोकांच्या पायाला हात लावून लोकांच्यातच राहून समाजकारणाबरोबरच राजकारण करण्यात यशस्वी झालो, वारसा हक्काने नाही. तेच चेहरा, तेच नेते, तीच घराणी यांना आज जनता कंठाळलेली आहे. लोकांना आता बदल हवाय आणि तो बदल घडविण्यासाठी तुम्ही आम्ही संघटित राहून काम केले पाहिजे. युवा पिढी समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात येत आहेत. विकासास त्यासाठी सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे’ यावेळी मार्केट कमेटी संचालक हिंदुराव चव्हाण, सुदाम दीक्षित, पृथ्वीराज निकम, भरत जाधव, यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)
बिनकामाचा डंका
एक-दोन लाखांचे विकासकाम दिल्यानंतर त्याचा उंका पिटणे व बोकड कापण्यास सांगणे आणि त्यावरच जनतेला पाच वर्षे झुलवत ठेवण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले आहे. अशा भाषेत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.