जलवाहिनीत चेंडूंचा ‘डाव’!

By Admin | Updated: September 23, 2014 23:52 IST2014-09-23T23:02:02+5:302014-09-23T23:52:56+5:30

पाणीपुरवठा विस्कळीत : चप्पल, प्लास्टिक बाटल्यांनी अडविले शहराचे पाणी

Watery bowlers 'innings'! | जलवाहिनीत चेंडूंचा ‘डाव’!

जलवाहिनीत चेंडूंचा ‘डाव’!

सातारा : शहरातील काही भागात गेल्या आठवड्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. जलवाहिनीत झालेला बिघाड शोधण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जंग जंग पछाडले; अखेर शोध लागला अन् जलवाहिनीत आढळले चक्क चेंडू, चप्पल अन् झाडू!
येथील नकाशपुरा पेठ व तेली खड्डा परिसरात गेल्या आठवड्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. यासाठी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम हाती घेतली. जंग जंग पछाडूनही बिघाड नेमका कुठे आणि काय झाला हे समजायला मार्ग नव्हता. अखेर परजाजवळ जलवाहिनीत बिघाड झाल्याचे समजले. याठिकाणी खड्डा खणून पाहिले तेव्हा जलवाहिनीत चक्क चेंडू, चपला अन् झाडू अडकल्याचे आढळून आले. तेली खड्ड परिसरात पाणीपुरवठा करणारी गणेश टाकी म्हणजेच ढोल्या गणपती टाकीच्या जलवाहिनीत प्लास्टिकच्या बाटल्या, गुुटख्याच्या पुड्या आणि चेंडू आढळून आहे. सातारा नगरपालिका कर्मचाऱ्यांनी ही टाकी स्वच्छ केली असून आता पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Watery bowlers 'innings'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.