वाईच्या कृष्णा नदी पात्राला जलपर्णीचा विळखा
By Admin | Updated: July 4, 2017 13:58 IST2017-07-04T13:58:57+5:302017-07-04T13:58:57+5:30
अस्वच्छतेमुळे भाविक व पर्यटकांना त्रास

वाईच्या कृष्णा नदी पात्राला जलपर्णीचा विळखा
आॅनलाईन लोकमत
पसरणी ( जि. सातारा) , दि. 0४ : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई येथील कृष्णा नदी पात्राला पुन्हा एकदा जलपणीर्ने विळखा घातला आहे. वाढत्या जलपर्णीमुळे नदी स्वच्छतेचा प्रश्न याही वर्षी ऐरणीवर आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून कृष्णा नदी पात्रात जलपणीर्ची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जलपणीर्मुळे पाण्याचे मोठ-मोठे डोह व नदीपात्र अस्वच्छ होऊ लागले आहे. अतिवेगाने वाढणाऱ्या या जलपणीर्ला हटविण्यासाठी व नदी स्वच्छ करण्यासाठी आजपर्यंत अनेक सामाजिक संस्था, प्रशासन व नागरिकांच्या वतीने नदी पात्राची स्वच्छता करण्यात आली आहे.
कृष्णा घाटावर असलेले महागणपती मंदिर पुरातन असून याठिकाणी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. महाबळेश्वर, पाचगणीला भेट देणारे अनेक पर्यटक देखील याठिकाणी देवदर्शनासाठी येतात. मात्र, नदीपात्रात वेगाने वाढणाऱ्या जलपणीर्मुळे नदीच्या सौंदयार्ला बाधा पोहचत असून अस्वच्छतेमुळे भाविक व पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या वर्षी धोम धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यावेळी नदी पात्रात वाढलेली जलपर्णी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊन पात्र स्वच्छ झाले होते. निसर्गाच्या कृपेने चांगला पाऊस झाला तर याही वर्षी नदीपात्र जलपर्णीमुक्त होईल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.