कास योजनेचा पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:52 IST2021-02-27T04:52:18+5:302021-02-27T04:52:18+5:30

सातारा : कास योजनेच्या मुख्य बंदिस्त जलवाहिनीली कासाणी गावाजवळ गळती लागली आहे. ही गळती काढण्याचे काम पाणीपुरवठा विभागाकडून सोमवारी ...

The water supply of Kas Yojana will be closed for two days | कास योजनेचा पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

कास योजनेचा पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

सातारा : कास योजनेच्या मुख्य बंदिस्त जलवाहिनीली कासाणी गावाजवळ गळती लागली आहे. ही गळती काढण्याचे काम पाणीपुरवठा विभागाकडून सोमवारी (दि. १) हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे कास योजनेचा पाणीपुरवठा सोमवार व मंगळवार बंद राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी दिली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा शहराला शहापूर व कास योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. कास योजनेच्या बंदिस्त जलवाहिनीला कासाणी गावाजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. ही गळती काढण्याचे काम सोमवारी हाती घेतले जाणार असून, याकामी सात ते आठ तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सोमवार (दि. १) व मंगळवारी (दि. २) योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.

Web Title: The water supply of Kas Yojana will be closed for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.