शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पावसाबरोबरच धरणातील साठाही रुसला, सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा पाणीसाठा..जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: October 9, 2023 18:31 IST

पाऊस कमी झाल्याने सिंचनासाठी धरणातून पाणी मागणी वाढणार 

सातारा : मान्सून परतला असून यंदा पावसाबरोबरच धरणातील साठाही रुसला आहे. कारण, प्रमुख सहा प्रकल्पात १२८ टीएमसीच पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत २० टीएमसी पाणी कमी आहे. तर यंदा प्रमुख धरणेही १०० टक्केही भरलेली नाहीत. त्यातच पूर्व भागातही एकदम कमी पाऊस झाल्याने सिंचनासाठी धरणातून पाणी मागणी वाढणार आहे.जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पडतो यावर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. यंदा मात्र, मान्सूनच्या पावसाने साफ निराशा केलेली आहे. पूर्व भागात तर दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. पाझर तलाव कोरडे पडले असून ओढ्यात ठणठणाट आहे. यामुळे रब्बी हंगाम घेण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. तर जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी अशी प्रमुख धरणे आहेत. या धरणातून पिण्यासाठी आणि सिंचणासाठीही पाण्याची तरतूद केलेली आहे. या सर्व प्रमुख धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७६ टीएमसी इतकी आहे.पण, यंदा मान्सूनचा पावसाने सरासरीही गाठली नसल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे. कारण, एकाही धरणात सध्या १०० टक्के पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत पाण्याची मागणी प्रचंड वाढणार आहे. परिणामी आहे त्या साठ्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

उरमोडीत अवघा ५८ टक्क्यांवर साठा..सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात उरमोडी धरण आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता ९.९६ टीएमसी इतकी आहे. पण, या धरणक्षेत्रात कमी पाऊस झाला. परिणामी धरणात ५.८३ टीएमसीच साठा झालेला आहे. ५८.५९ टक्के धरण भरलेले आहे. त्यातच या धरणातील पाण्यावर सातारा तालुक्याबरोबरच माण आणि खटाव तालुक्यातील पिण्याचे पाणी आणि शेती पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. धरण भरले नसल्याने आवर्तनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोयनेत ९४ टीएमसी पाणी...राज्यातील मोठ्या धरणापैकी एक कोयना आहे. १०५.२५ टीएमसी धरण आहे. या धरणात ९३.९९ टीएमसीच पाणीसाठा झालेला आहे. टक्केवारीत हे प्रमाण ८९.३० इतके आहे. या धरणातील पाण्यावर सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. मागणीनुसार धरणातून पाणी सोडण्यात येते. यंदा धरणात ११ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर योग्यरितीने करावा लागणार आहे.

येरळवाडीत शुन्य टक्के साठाखटाव तालुक्यात येरळवाडी धरण आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमत १.१५ टीमएसी आहे. पावसाअभावी धरणसाठा झालाच नाही. सध्या या धरणात ०.२७ टीएमसी म्हणजे शुन्य टक्के पाणीसाठा आहे. त्यातच या धरणात खटावमधील अनेक गावांच्या पाणी योजना अवलंबून असतात. त्यामुळे पाणीटंचाई भासणार आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)

धरणे   गतवर्षी     यावर्षी   यंदाची टक्केवारी      एकूण क्षमता
धोम   १३.५०   १०.६८   ७९.०७   १३.५०
कण्हेर१०.०९   ८.१३ ८०.५३     १०.१०
कोयना १०४.६१  ९३.९९   ८९.३०   १०५.२५
बलकवडी ४.०८    ३.८१   ९३.५०   ४.०८
उरमोडी ९.९४   ५.८३   ५८.५९   ९.९६
तारळी ५.७३    ५.८३   ९५.६०   ५.८५

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणWaterपाणी