शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Satara- कोयना धरणातील पाणीसाठा ९१ टीएमसीच्या दिशेने, धरण भरण्याबाबत चिंताच 

By नितीन काळेल | Updated: September 21, 2023 15:52 IST

महाबळेश्वरला ६२ मिलीमीटर पावसाची नोंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू असून गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात महाबळेश्वरला सर्वाधिक ६२ मिलीमीटरची नोंद झाली. त्यातच धरण क्षेत्रातही पाऊस होत असल्याने कोयना साठ्यानेही ९१ टीएमसीच्या दिशेने झेप घेतली आहे. तरीही धरण भरण्यासाठी अजून १४ टीएमसी पाण्याची गरज असल्याने भरणार का याबाबत चिंता कायम आहे.जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. पश्चिम भागात पावसाने चांगली हजेरी लावली असलीतरी गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. तर पूर्व भागात अजूनही पावसाची प्रतीक्षाच आहे. यामुळे खरीप हंगाम चांगल्या पद्धतीने पदरी पडेल अशी आशा नाही. आता पावसाळ्याचे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. तरीही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. पश्चिम भागात गेल्या काही दिवसापासून पावसाची उघडझाप सुरू आहे. त्यामुळे पिकांना फायदा होत आहे. त्याचबरोबर धरणातही पाण्याची सावकाशपणे आवक होत आहे. तरीही अनेक प्रमुख मोठी धरणे शंभर टक्के भरतील का याविषयी साशंकता आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात कोयनानगर येथे २५ मिलीमीटर पाऊस झाला. तर नवजाला ३२ आणि महाबळेश्वरला ६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. एक जूनपासूनचा विचार करतात कोयनेला ३८३३ तर नवजा येथे ५५०६ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर महाबळेश्वर येथे ५२५८ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर कोयना धरण क्षेत्रातही पाऊस पडतोय. त्यामुळे गुरुवारी सकाळच्या सुमारास धरणात ७४८३ क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ९०.४६ टीएमसी झाला होता. गेल्या काही दिवसापासून धरणातून पाणी विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणी