सातारा शहरात पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST2021-02-05T09:18:12+5:302021-02-05T09:18:12+5:30

.................... बाजारात गर्दी सातारा : ग्रामीण भागामध्ये भरणाऱ्या आठवडी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, सोशल डिस्टन्सिंग चा फज्जा ...

Water shortage in Satara city | सातारा शहरात पाण्याची नासाडी

सातारा शहरात पाण्याची नासाडी

....................

बाजारात गर्दी

सातारा : ग्रामीण भागामध्ये भरणाऱ्या आठवडी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, सोशल डिस्टन्सिंग चा फज्जा उडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महिने आठवडी बाजार बंद करण्यात आली होती. मात्र, सध्या असल्याने ग्रामीण भागातील गावच्या आठवडी बाजार पूर्ववत भरू लागले आहेत.

.........

कारवाईची मागणी

सातारा : जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या वाहन पार्किंगशेजारी नव्याने ऑक्सिजन प्लँट बसविण्यात आला आहे. मात्र, संरक्षक भिंतीलगत असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे. या गाड्यांवर सिलिंडरचा स्फोट अथवा स्टोव्हचा भडका उडाल्यास ऑक्सिजन नळ्या फुटण्याची भीती आहे.

.......

नागरिकांमध्ये भीती

सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट संगमनगर कृष्णानगर परिसरात मोकाट जनावरे बरोबर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहनधारकांना ही कुत्री अडथळा करत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

.............

विद्यार्थ्यांकडून स्वच्छता

सातारा : सिल्क इन्फोटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरमधील विद्यार्थ्यांनी नक्कीच वृद्धाश्रमास भेट देऊन तेथील ज्येष्ठांची संवाद साधला. समता वृद्धाश्रमात सर्व विद्यार्थी उपस्थित होते. तेथे त्यांनी वृद्धांची सेवा केली तसेच स्वच्छता केली. संस्थेच्यावतीने सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, अशी माहिती संचालक सागर शिंदे यांनी दिली.

...............

प्राण्यांचा संचार वाढला

सातारा : लाकडांमध्ये मानवाचा वावर कमी झाल्याने पशुपक्षी व वन्यजीवांचा वावर वाढला होता. रस्त्यांवर वाहनांची संख्या रोडावली आणि पशुपक्षी व वन्यजीव मुक्तसंचार करत होते. मात्र आता सर्व पूर्वीप्रमाणेच सुरू झाले आहे. त्यामुळे वारंवार माणसांचं नागरिकांची गर्दी वाढली असती तरी वन्यजीवन मानवी वस्त्यांमध्ये संचार वाढला आहे.

...............................

गावोगावी जनजागृती

सातारा : भुईंज तालुका वाई येथील महामार्ग पोलीस केंद्रामार्फत ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ करण्यात आला अभियानाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या चित्ररथ यामार्फत महामार्गालगत असणाऱ्या या गावांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे.

..............................

वणव्याचे प्रमाण वाढले

सातारा : वणवे लागण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढत चालले आहे. त्यामुळे डोंगरदऱ्यासह जंगलातील गवत पूर्णपणे वाळून जात आहे. थोडीशी ठिणगी पडताच त्याला वणव्याचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर्षी वणवे थांबवणे हे वन्य वनविभागासमोर सर्वांत मोठे आव्हान ठरणार आहे.

..........................

निर्बंध पाळणे गरजेचे

सातारा : जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणूक मतमोजणी झाली. हा निकाल ऐकण्यासाठी झालेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी महामारी संपलेली नाही. त्यामुळे अनलॉक प्रक्रियेत कोरोनाबाबतची निर्बंध पाळणे गरजेचे आहे.

.....................

वाहतुकीचा खोळंबा

सातारा : सातारा शहरातील मध्यवस्तीमधील रस्ते आधीच अरूंद असून, या रस्त्यावरच थांबलेल्या वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरातील बाजारपेठेत सर्वच रस्त्यावर लगतच्या गाळे अतिक्रमण केले. त्यामुळे वाहन पार्किंगला जागा उरली नसल्याने ही वाहने रस्त्यावरील वाहतुकीचा अडथळा ठरत आहेत.

......................

इंटरनेट सेवेचा बोजवारा

बामनोली : जावळी तालुक्यात अनेक भागात इंटरनेट सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून खंडित सेवेमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तो मोबाईल रेंज आणि इंटरनेटचा खेळखंडोबा झाल्याने पोस्ट बँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची ससेहोलपट सुरू आहे. डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आणि दुर्गम समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील कोपऱ्यात नागरिकांच्या हातात मोबाईल पोहोचले असल्याने ग्राहकांकडून तक्रारी केल्या जात आहेत.

.......................

मोबाईल चोरटे सक्रिय

वाई : वाई शहरात गेल्या अनेक दिवसांपासून घरीच याठिकाणी मोबाईल चोरटे सक्रीय झाले आहेत. त्यांचा शहरात सुळसुळाट झाला असून सध्या भाजीमंडई चोरट्यांच्या रडारवर आहे. भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या वाईकरांना मंडईतूनच मोबाईलविना परतावे लागत आहे.

....................

सालपे-लोणंद मार्गावर अपघातांमध्ये वाढ

आदर्की : सातारा-पुणे रोडवरील सालपे ते लोणंद या पंधरा किलोमीटर रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने अपघातात वाढ झाली आहे. तसेच वाहनांचे पार्ट निकामी होत आहेत तर वाहनधारकांचे कंबरडे मोडत असल्याने संताप व्यक्त होत आहे. सातारा-पुणे रोडवर सालपे-लोणंद दरम्यान कोपर्डे, तांबवे, आरडगाव फाटा, हिंगणगाव, सालपे आदी गावांतील नागरिक दुचाकीवरून मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. (फोटो न्यूज... २९आदर्की)

Web Title: Water shortage in Satara city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.