शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईची स्थिती भयावह; एक लाख लोकांची तहान टॅंकरवर

By नितीन काळेल | Updated: November 24, 2023 18:45 IST

उन्हाळ्यात टंचाई निवारणासाठी सुरू झालेल्या टॅंकरची चाके थांबेनात

सातारा : जिल्ह्यात उन्हाळ्यात टंचाई निवारणासाठी सुरू झालेल्या टॅंकरची चाके जून-जुलैमध्ये थांबतात. पण, यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यातील ५ तालुक्यातील सुमारे १ लाख नागरिक आणि ६९ हजार पशुधनाला टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे. सध्या हिवाळ्यातच ६७ गावे आणि २६५ वाड्या तहानल्या असल्यातरी आगामी काळात टॅंकरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.जिल्ह्यात मागील तीन वर्षांत चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे उन्हाळ्यातील टंचाई सोडलीतर जुलै महिना उजाडताच टॅंकर बंद व्हायचे. यंदा मात्र, पावसाने घात केला. त्यामुळे टंचाईची स्थिती कायम आहे. विशेषत: करुन माण तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. मागील सहा महिन्यांपासून टॅंकरवरच अनेक गावांची तहान अवलंबून आहे.माण तालुक्यात १०५ गावे आहेत. त्यातील ३१ गावे आणि २२८ वाड्यांना टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे. यासाठी ३५ टॅंकर सुरू असून त्यावर ४८ हाजर नागरिक आणि ५३ हजार जनावरांची तहान अवलंबून आहे. पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, हस्तनपूर, भाटकी, खडकी, ढाकणी, धुळदेव, कारखेल, वरकुटे - म्हसवड, संभूखेड, वाकी, रांजणी, हवालदारवाडी, पळशी, पिंपरी, भालवडी, खुटबाव, पर्यंती, मार्डी, इंजबाव, वारुगड, परकंदी, महिमानगड, उकिर्डे, पांढरवाडी, सुरुपखानवाडी, विरळी, कुरणेवाडी या गावांसह वाड्यावस्त्यांवर टॅंकर सुरू आहे.

खटाव तालुक्यातीलही ६ गावे आणि ९ वाड्यांसाठी ३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मांजरवाडी, नवलेवाडी, मांडवे, गोसाव्याचीवाडी, धारपुडी येथील सुमारे ५ हजार नागरिक आणि २ हजारांहून अधिक पशुधनाला टॅंकरचाच आधार आहे. तर फलटण तालुक्यात अजुनही १० गावे आणि २८ वाड्यांसाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरुड आदी गावांतील १२ हजार नागरिक आणि ११ हजार पशुधन टॅंकरवर अवलंबून आहे.कोरेगाव तालुक्यात तर १९ गावांतील ३१ हजार नागरिक आणि अडीच हजार पशुधनाला टॅंकरचा आधार आहे. यासाठी १४ टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी, जाधववाडी, होसेवाडी, गुजरवाडी, अनभुलेवाडी, नायगाव, नांदवळ, पिंपोडे बुद्रुक येथे टॅंकर सुरू आहे. वाई तालुक्यातीलही एका गावातील १२०० नागरिक आणि २८९ जनावरांना टॅंकरचा आधार आहे.

जिल्ह्यात ६१ टॅंकर सुरू..जिल्ह्यातील माण तालुक्यात टंचाईची स्थिती भयावह आहे. त्यात आणखी वाढ होत जाणार आहे. सध्या जिल्ह्यात ६१ टॅंकरद्वारे लोकांना आणि पशुधनाला पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये शासकीय ११ आणि खासगी ५० टॅंकर आहेत. जानेवारीनंतर टंचाईग्रस्त गावे, वाड्यावस्त्यांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे.

विहिरी अन् बोअरवेलचेही अधिग्रहण..टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच विहिरी आणि बोअरवलेचेही पाणी उपलब्ध केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात १७ विहिरी आणि ३५ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. माणमध्ये ५ विहिरी, १० बोअरवेलचे अधिग्रहण झाले आहे. खटाव तालुक्यात ३ विहिरी, २१ बोअरवेल अधिग्रहीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीdroughtदुष्काळ