शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

साताऱ्यात ८२ गावे ४०४ वाड्यांत पाण्याचा ठणठणाट, पावसाची स्थिती पाहता टंचाईत वाढ होणार 

By नितीन काळेल | Updated: September 6, 2023 16:37 IST

जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाऊस नाही

सातारा : पावसाळा संपत आलातरी अजुनही जिल्ह्यातील बहुतांशी भागात दमदार पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळी भागात पाण्याचा ठणठणाट असून टंचाईतही वाढ झाली आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यातील ८२ गावे आणि ४०४ वाड्यांच्या घशाला कोरड असून त्यासाठी ८६ टॅंकर सुरू आहेत. त्यातच पावसाची स्थिती पाहता टंचाईत वाढ होणार आहे.जिल्ह्यात २०१७-१८ साली दुष्काळी स्थिती होती. त्यावेळी जवळपास २०० हून अधिक गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, मागील चार वर्षांत पर्जन्यमान चांगले झाले. त्यामुळे टंचाईची स्थिती फारशी उद्भवली नाही. मार्च-एप्रिलमध्ये टॅंकर सुरु झालातरी जूनपर्यंत तो सुरू राह्याचा. मात्र, यंदा टंचाईची परिस्थिती गडद आहे. सप्टेंबर महिना सुरू झालातरी जिल्ह्याच्या बहुतांशी भागात चांगला पाऊस झालेला नाही. पूर्व भागात कायम प्रतीक्षा असून पश्चिमेकडेच बऱ्यापैकी पडला आहे. त्यामुळे पश्चिमेकडे पाण्याची टंचाई नाही. मात्र, पूर्व भागातील माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव या तालुक्यात टंचाई वाढू लागली आहे.जिल्ह्यातील माण तालुक्यात भयावह स्थिती आहे. एकूण ४७ गावे आणि ३४३ गावांना ६० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टॅंकरवर सुमारे ७५ हजार नागरिक आणि ६१ हजार पशुधनाची तहान अवलंबून आहे. तालुक्यात पांगरी, वडगाव, बिजवडी, मोगराळे, पाचवड, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, रांजणी, पळशी, पिंपरी, भालवडी, खुटाबा, मार्डी, खुटबाव, पर्यंती, वारुगड, परकंदी, पांढरवाडी, उकिर्डे, पिंगळी बुद्रुक, सुरुपखानवाडी, कुरणेवाडी आदी गावांसह वाड्यांवर पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे टॅंकर सुरू करण्यात आले आहेत.खटाव तालुक्यातही टंचाई वाढू लागली आहे. त्यामुळे सध्या १९ गावे आणि २४ वाड्यांसाठी टॅंकर सुरू आहे. तालुक्यातील २६ हजार नागरिक आणि साडे सात हजार जनावरांना १२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मांजरवाडी, मोळ, गारवडी, नवलेवाडी, मांडवे, गोसाव्याचीवाडी, कणसेवाडी, खातवळ, येलमरवाडी, पडळ, कान्हरवाडी, धोंडेवाडी आदीं गावांसह इतर वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यातही टंचाई आहे. ८ गावे आणि ३७ वाड्यांसाठी १० टॅंकर सुरू आहेत. या टॅंकरवर १३ हजार ८२५ नागरिक आणि १४ हजारांवर जनावरांची तहान अवलंबून आहे. सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरुड, चांभारवाडी, घाडगेमळा आदी ठिकाणी टंचाई निवारणासाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.तर कोरेगाव तालुक्यातही ६ गावांत टंचाई आहे. यासाठी ३ टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी येथे टंचाई असून साडे तीन हजार नागरिक आणि २ हजार पशुधनाला पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच वाई तालुक्यातही दोन गावांना टंचाईची समस्या आहे.

सव्वा लाख नागरिक; ८५ हजार पशुधन विळख्यात...जिल्ह्यात टंचाईची स्थिती वाढत चालली आहे. त्यामुळे आज पाच तालुक्यातील १ लाख १९ हजार ६६० नागरिक आणि ८५ हजारांवर पशुधनाला टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक टंचाई माण तालुक्यात आहे. टंचाई निवारणासाठी शासकीय ७ आणि खासगी ७७ टॅंकर सुरू आहेत. तर २० विहिरी आणि ३३ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसdroughtदुष्काळ