पाण्याची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:39 IST2021-03-19T04:39:17+5:302021-03-19T04:39:17+5:30
डिस्टन्सिंगचा फज्जा सातारा : कोरोना व लोकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून वडाप बंद होते. त्यामुळे या व्यावसायिकांवर बेरोजगारी ...

पाण्याची टंचाई
डिस्टन्सिंगचा फज्जा
सातारा : कोरोना व लोकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून वडाप बंद होते. त्यामुळे या व्यावसायिकांवर बेरोजगारी ओढवली होती. ग्रामीण भागात एसटीच्या ठरावीक फेऱ्या होत असल्याने तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रवासावर निर्बंध असल्याने खासगी वाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे कोरोना पुन्हा फैलावत आहे.
ओढ्यावर अतिक्रमणे
सातारा : पालिकेच्या हद्दवाढीत विलासपूर परिसराचा समावेश करण्यात आला आहे. भागातील प्लॉटधारकांनी अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात केल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. या परिसरातील रहदारी वाढल्याने आता पालिकेने अनधिकृत बांधकामे पाडून मुख्य रस्ते मोठे करण्याची गरज आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
मोबाईल चोरटे सक्रिय
वाई : वाई शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल चोरटे सक्रिय झाले आहेत. त्यांचा शहरात सुळसुळाट झाला असून, सध्या भाजीमंडई चोरट्यांच्या रडारवर आहेत. भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या वाईकरांना मंडईतूनच मोबाईलविना घरी परतावे लागत आहे.
घाट रस्ते धोकादायक
सातारा : जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर पर्यटकांची वर्दळ वाढली असून, अरुंद घाट रस्त्यावर अधूनमधून होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पर्यटक व प्रवाशांची गैरसोय होत आहे. सातारा शहराच्या पश्चिमेस कास पठार, सज्जनगड, यवतेश्वर, तापोळा, महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. या पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी घाट मार्गातून जावे लागते.
घाणीच्या विळख्यात
सातारा : जुना मोटर स्टॅँड परिसरात रस्त्यावर भरणाऱ्या भाजीमंडईमुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील काही विक्रेत्यांना रस्त्यावर बसूनच भाजी विक्री करावी लागत आहे. या ठिकाणी कचरा कुंडीची व्यवस्था नसल्याने भाजीपाला रस्त्यावरच टाकत आहेत.
पाण्याचा जास्त वापर
सातारा : शहराच्या लगत असणाऱ्या अनेकज महादरे तलावात वाहने धुण्यासाठी नेत असताता. मात्र, बहुतांशजणांनी सोसायटीतील साठवण टाकीतून गाड्या धुतल्या. यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर झाल्याने काही नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.