शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

खंडाळ्यात जलक्रांती; तलाव भरले तुडुंब...

By admin | Updated: September 26, 2016 00:13 IST

हरितक्रांतीचे बीज रोवले : ‘जलयुक्त’च्या कामामुळे शेतीपाण्याचा प्रश्न मार्गी; गावोगावची पाणीटंचाई दूर

खंडाळा : तालुक्यात दरवर्षी गावोगावी जाणवणारी भीषण पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेतून भरीव काम करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात झालेल्या पावसाने सर्वच ठिकाणचे तलाव पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. लोकसहभाग, जलयुक्त योजनेतील कामाने तालुक्यात जलक्रांती झाली असून, त्या माध्यमातून शेती पाण्याचाही प्रश्न मार्गी लागल्याने हरितक्रांतीचे बीज रोवले गेले आहे. खंडाळा तालुक्यातील विविध गावांना गेल्यावर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. अनेक गावांमधून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागले होते. त्यामुळे पुढील काळात अशी पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी ‘जलयुक्त शिवार’ योजनेत लोकसहभागातून धरणे, तलाव, बंधारे यातील गाळ काढून खोलीकरण करण्याची कामे हाती घेण्यात आली होती. तालुक्यातील खेड बु।। येथील तुळशी वृंदावन धरणासह, कण्हेरी, बावडा, म्हावशी, धावडवाडी, विंग, अजनूज, भादे, घाटदरे, हरळी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचे काम केले गेले. तर काही गावांमध्ये नवीन बंधारे लोकसहभागातून बांधले गेले. तसेच शासनाच्या लघुपाटबंधारे विभागातून सिमेंट बंधारेही बनविण्यात आल्याचे जलसंधारणाच्या कामात मोठी क्रांती घडून आली. यासाठी लोकांसोबत प्रशासनानेही पाऊल उचलले होते. पावसाळ्यानंतर याच तलावातमधून पाणी साठल्याने कधीकाळी कोरडे पडणारे हे पाणीसाठे तुडुंब भरले आहेत. लोकांना त्यांच्याच केलेल्या कामाची पावती निसर्गाने दिल्याने मोठे समाधान व्यक्त केले जात आहे. शिवारातील बंधाऱ्यामधून पाणी साठल्याने त्या परिसरातील विहिरी कूपनलिका यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याचा फायदा सध्या खरीप हंगामातील पिकांनाही होत आहे. सध्या सर्वत्र पावसाने ओढ दिली असली तरी शिवारात पाणी असल्याने पिके जोमात आहेत. धान्य पिकांचे उत्पादनात वाढ होेणार असल्याने ही हरितक्रांतीची बीजे असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. पाण्यामुळे सर्व गावातून शिवारं जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढील वर्षी पाणीटंचाईची समस्या आता भासणार नाही. जलसंधारणातील हेच काम औद्योगिकसह कृषी क्षेत्रातही योगदान देणारे ठरणार आहे. (प्रतिनिधी) जलयुक्त शिवार योजनेतून बंधारे, तलाव यातील गाळ काढून पाणीसाठवण क्षमता वाढविण्यासाठी लोकांसोबत प्रशासनानेही काम केले. ज्या गावातून मागणी झाली तेथे भरीव काम झाले. हजारो ब्रास माती गाळ काढल्याने पाणीसाठवणीबरोबर खडकाळ माळरानही ओलिताखाली आल्याचे दिसून येत आहे. -शिवाजीराव तळपे, तहसीलदार बावडा गावामध्ये लोकसहभागातून धरणतील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले. तालुक्यातील सर्वाधिक प्रमाणात गाळ या गावात काढण्यात आला. ओढाजोड प्रकल्पामुळे सध्या धरण तुडुंब भरले आहे. पाणीसाठा वाढल्याने पिण्याचे पाणी आणि शेतीपाणी दोन्ही बाजू भक्कम आहेत. - मनोज पवार, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती