शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोयना धरणाचे दरवाजे उघडणार!, नदीकाठी सतर्कतेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 19:23 IST

सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचलण्यात येणार

सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत चालला आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी सकाळच्या सुमारास या पावसाळ्यात प्रथमच धरणाच्या दरवाजातून विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच नदीपात्रात आणखी सुमारे ५ हजार क्यूसेक विसर्ग होणार आहे. यामुळे कोयना नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.पाटण तालुक्यातील कोयना धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. यावर्षी वेळेत आणि दमदार पाऊस झाला. मागील एक महिन्यापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे. पण, मागील आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी झालेले. मात्र, रविवारपासून पुन्हा पाऊस वाढला आहे. त्यामुळे धरणात पाणी आवक वाढली आहे. तसेच धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसीजवळ पोहोचलाय. मान्सूनचा कालावधी विचारात घेता अजून अडीच महिने पाऊस राहणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवार, दि. १५ जुलै रोजी सकाळच्या सुमारास धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचलण्यात येणार आहेत. त्यातून सुमारे ५ हजार क्यूसेक विसर्ग होऊ शकतो. तर सध्या पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे एकूण ७ हजार १०० क्यूसेक विसर्ग होणार असल्याने कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.