पाण्यामुळे आरोग्याच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:39 IST2021-03-20T04:39:05+5:302021-03-20T04:39:05+5:30

बामणोली डोंगर काळवंडले सातारा : वणवे लावू नयेत यासाठी वन विभाग जनजागृती करून वणवे रोखण्यासाठी प्रयत्न करत असतो. यासाठी ...

Water-related health complaints | पाण्यामुळे आरोग्याच्या तक्रारी

पाण्यामुळे आरोग्याच्या तक्रारी

बामणोली डोंगर काळवंडले

सातारा : वणवे लावू नयेत यासाठी वन विभाग जनजागृती करून वणवे रोखण्यासाठी प्रयत्न करत असतो. यासाठी गावा-गावात शाळांमध्ये प्रबोधन सुरू असताना, बामणोली भागातील डोंगरांना मात्र अज्ञातांकडून वणवा लावल्याने डोंगर काळवंडले आहेत.

कण्हेरला प्रेमवीरांची रपेट

सातारा : कास परिसरात सहकुटुंब फिरायला येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने प्रेमीयुगुलांनी आपला मोर्चा कण्हेर धरण परिसराकडे वळविला आहे. महाविद्यालये सुरू झाल्यानंतर हा फेरफटका वाढला असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.

उकाड्याने रस्ते ओस

सातारा : उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे दुपारी १ ते ४ या वेळेत रस्ते ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अति महत्वाच्या कामानिमित्त बाहेर पडलेल्यांचेही उन्हामुळे हाल होत असल्याने तेही रसवंतीगृहाचा आसरा घेत आहेत.

रस्त्यावर टपऱ्यांचा उच्छाद

सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट चौक व वाढे चौक परिसरात प्रवाशांची गर्दी असते. या प्रवाशांसाठी उभ्या राहिलेल्या टपऱ्या येथून ये-जा करणाऱ्यांच्या डोक्याला त्रास देणाऱ्या ठरल्या आहेत. भूछत्र्यांप्रमाणे उगवलेल्या या टपऱ्यांमुळे वाहतुकीची कोंडीही होताना दिसत आहे.

Web Title: Water-related health complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.