शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

प्रत्येक गावात पाणी योजना तरीही वणवण- टंचाईची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:00 AM

सूर्यकांत निंबाळकर । आदर्की : फलटण पश्चिम भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याला जबाबदार अधिकारी व नेते आहेत, ...

ठळक मुद्दे: आदर्की मंडलातील दहा गावांमधील ग्रामस्थांची पायपीट सुरूच--खोल-खोल पाणी !

सूर्यकांत निंबाळकर ।आदर्की : फलटण पश्चिम भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याला जबाबदार अधिकारी व नेते आहेत, कारण आदर्की मंडलातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या चार ते पाच पाणीपुरवठा योजना असूनही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. फलटण पश्चिम भागातील आदर्की मंडलात दहा ते एकरा गावे येतात. या गावात जिल्हा परिषद, आमदार, खासदार, जिल्हा परिषद व अन्य निधीतून पाणीपुरवठा योजना राबवताना भूजलपातळीचा विचार न करता सर्व्हे, विहिरीचे खोदकाम ओढ्याकडेला केले आहे.

ठेकेदाराने विहिरीचे काम पाण्याअभावी खोलीकरण केले नाही, त्यामुळे पाणीसाठा होत नाही. पावसाळ्यात ओढ्याला पाणी असते, त्यामुळे पाणी टंचाई भासत नाही. अधिकारी, ठेकेदार संगनमत करून बिले काढतात. प्रत्येक टंचाई काळात नवीन पाणीपुरवठा योजना राबवतात; मात्र जुन्या तशाच पडून राहतात.

आदर्की खुर्द येथे दुरुस्तीसाठी खासदार फंडातून स्वंतत्र पाणीपुरवठा टाकी यावर लाखो रुपये खर्च केले, त्याच दुरुस्तीसाठी पेयजल योजनेतून बिचकुले वस्तीसाठी दुसरी पाणीपुरवठा योजना राबवली. बिचकुले वस्तीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवली आहे.

दोन विहिरी आहेत; परंतु दुरुस्तीसाठी हातपंपावर मोटर बसवली आहे.काकडे वस्तीसाठी जुन्या आडाचे रुंदीकरण केले व स्वतंत्र पाण्याची टाकी बांधून नळ पाणीपुरवठा योजना राबवली आहे, तीही बंद आहे. त्यानंतर दुसरी गावातील विहिरीवरून पाईपलाईन करून पाण्याची उपसा केली. वरील सर्व योजना बंद आहेत. पाच वर्षांपूर्वी पेयजेल योजनेतून अंदाजे ७२ लाख खर्चून पाणीपुरवठा योजना राबवताना स्वतंत्र विहीर खोदली, तीही पहिल्या योजनेच्या विहिरींपासून केवळ दहा मीटर अंतरावर ओढ्यातच. त्यामुळे आता दोन्ही विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पाणी टंचाई जाणवू लागली आहे.

आदर्की बुद्रुकमधील शिंदे मळ्यातील पाणीपुरवठा करणारी विहीर कोरडी पडली म्हणून २००४ मध्ये आदर्की खुर्द येथे विहीर खोदून चार किलोमीटर पाईपलाईन योजना सुरू केली. आता ती बंद असून, विहीर व पाईपलाईन तशीच व दुसरी लोकवर्गणीतून हिंगणगाव धरणात विहीर खोदून दुसरी योजना राबवली आहे. बिबी येथे २००४ मध्ये पाणी टंचाई काळात घाडगेवाडी येथून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी लाखो रुपये खर्चून पाईपलाईनद्वारे बिबी गावास नेले. त्यानंतर धोम-बलकवडी कालव्याला आले. बिबीत पाणी टंचाई दूर झाली. लाखो रुपये खर्चून केलेली पाईपलाईन तशीच आहे. या गावात शासनाकडून विहीर अधिग्रहण प्रक्रिया सुरू आहे.

कालव्याशेजारील गावाला टँकरने पाणी..घाडगेवाडी येथे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुळीकवाडी धरणाखाली विहीर खोदूनही पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर आज घाडगेवाडीला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सासवड येथे अनेक पाणीपुरवठा योजना लाखो रुपये खर्चून पूर्ण केल्या. गतवर्षी मुळीकवाडी धरणातून पाणी आणले; पण यावर्षी धरणच आटले. आता गावाला नीरा उजवा कालव्याशेजारी गावाला पाणी पुरवठा केला जातो तर वाडी-वस्तीवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

आदर्की मंडलात पाणी योजनेद्वारे पाणी विहिरीत सोडले जाते. त्यामुळे वृद्धांना अशा प्रकारे सायकलवरून पाणी आणावे लागत आहे. 

सार्वजनिक विहिरीत टँकरद्वारे पाणी सोडले जाते; पण पिण्यासाठी पाणी सायकलवरून बाहेरून आणावे लागते. ही पायपीट कधी थांबणार.- आनंदराव सापते, घाडगेवाडी, ता. फलटण

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater shortageपाणीटंचाई